IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत या खेळाडूला शेवटची संधी, अन्यथा बाहेरचा रस्ता!

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होत आहे. 22 सप्टेंबरला पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे. या सामन्यात एका खेळाडूवर क्रीडाप्रेमींची नजर असणार आहे. अन्यथा थेट संघातून वगळलं जाण्याची शक्यता आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत या खेळाडूला शेवटची संधी, अन्यथा बाहेरचा रस्ता!
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत स्वत:ला सिद्ध करूनच दाखवावं लागणार, नाहीतर मिळणार डच्चू!
| Updated on: Sep 21, 2023 | 7:33 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेचं जेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडिया पुन्हा वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी सज्जा झाली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेत कसोटी लागणार आहे. 22 सप्टेंबरपासून तीन सामन्याची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यात काही खेळाडूंना सिद्ध करावं लागणार आहे. अन्यथा वनडे वर्ल्डकप संघाच्या फायनल स्क्वॉडमधून डावललं जाण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यात केएल राहुल याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तसेच रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव यांना आराम दिला गेला आहे. त्यामुळे पहिल्या दोन वनडे सामन्यात टीम इंडियाची चांगलीच कसोटी लागणार आहे. त्यामुळे काही खेळाडूंना दोन सामन्यांचा कठीण पेपर सोडवावा लागणार आहे. इतकंच काय या मालिकेत हवी तशी कामगिरी झाली नाही तर वनडे वर्ल्डकप संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.

सूर्यकुमार यादव याची कसोटी

सूर्यकुमार यादव जगातील नंबर 1 टी 20 खेळाडू आहे. पण वनडे फॉर्मेटमध्ये हवी तशी कामगिरी झालेली नाही. या उलट ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तीन वेळा सलग शून्यावर बाद झाला होता. आशिया कप 2023 स्पर्धेतही एकदा संधी मिळाली पण संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. इतकं होऊनही संघ प्रशासनानं सूर्यकुमार यादव याच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव फेल गेला तर मात्र संघात दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते.

सूर्यकुमार यादव याची वनडे क्रिकेट कारकिर्द

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मागच्या मालिकेत सूर्यकुमार यादव पूर्णपणे अपयशी ठरला होता. मालिकेत फक्त सहा चेंडू खेळला होता. तसेच तीन वेळा सलग शून्यावर बाद झाला होता. वानखेडे, विशाखापट्टणम, चेन्नईत सूर्यकुमार यादव खातंही खोलू शकला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर चांगली कामगिरी करणं अवघड असणार आहे. सूर्यकुमार यादव वनडे आतापर्यंत 27 वनडे सहभागी होता आणि 25 डावात खेळण्याची संधी मिळली. त्याने 24.40 सरासरीने 537 धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार याद याने आतापर्यंत दोन अर्धशतकं झळकावली आहे. आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव याला बांगलादेश विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती. पण 26 धावा करून बाद झाला. गेल्या 19 डावात एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. वनडेत शेवटचं अर्धशतक 19 महिन्यांपूर्वी झळकावलं होतं. त्यामुळे वनडे वर्ल्डकप संघात स्थान टिकवायचं असेल तर धावा करणं आवश्यक आहे.