IND vs AUS : विराट आणि रोहित यांना पहिल्या दोन वनडेत का दिला आराम? राहुल द्रविड म्हणाला…
IND vs AUS ODI Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. पण पहिल्या दोन वनडेत रोहित आणि विराट नसणार आहेत. याबाबत राहुल द्रविड याने खुलासा केला आहे.

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा खेळाडूंची चाचपणी होणार आहे. दुसरीकडे, पहिल्या दोन वनडे सामन्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना आराम दिला गेला आहे. तर दोन सामन्यांसाठी कमान केएल राहुल याच्याकडे असणार आहे. तसेच उपकर्णधार म्हणून रवींद्र जडेजा भूमिका बजावणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. असं असताना सुरुवातीच्या दोन सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आराम का देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत आता प्रशिक्षक राहुल द्रविड याने खुलासा केला आहे.
काय म्हणाला प्रशिक्षक राहुल द्रविड?
भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने जिओ सिनेमावर एका चर्चेदरम्यान दोघांना आराम देण्याबाबत खुलासा केला आहे. “विराट आणि रोहित शर्मा या दोघांना आराम देण्याचा निर्णय चर्चा करूनच घेतलेला आहे. कारण हे दोन्ही खेळाडू वनडे वर्ल्डकप 2023 साठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षण असणं गरजेचं आहे.”, असं प्रशिक्षक राहुल द्रविड याने सांगितलं.
दुसरीकडे, सूर्यकुमार यादव याला पूर्ण समर्थन असल्याचंही राहुल द्रविड याने सांगितलं. “सूर्यकुमार यादव याला संघाचं पूर्ण समर्थन आहे. नक्कीत तो वनडे फॉर्मेट चांगली कामगिरी करेल.”, असं राहुल द्रविड याने सांगितलं. पहिल्या दोन वनडे सामन्यात केएल राहुल कर्णधार असणार आहे. पहिला वनडे सामना 22 सप्टेंबर, तर दुसरा वनडे सामना 24 सप्टेंबरला असणार आहे.
तिसरा वनडे सामना 27 सप्टेंबरला होणार असून या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार आहेत. तर वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा यांना आराम दिला जाईल. पण आर अश्विन संघात असेल. अक्षर पटेल रिकव्हर झाला नाही तर अश्विनला संघात संधी मिळेल.
पहिल्या दोन वनडेसाठी टीम इंडिया
केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, वाशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
