Video : दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोचा विराट कोहलीला ओळखण्यास नकार, फोटो दाखवताच म्हणाला…

विराट कोहली क्रिकेटविश्वातलं मोठं नाव..जगभरात त्याचे चाहते आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक चाहते असलेला आशियाई खेळाडू आहे. असं असताना दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. यात विराट कोहलीला ओळखतो का? असा प्रश्न विचारण्यात आला पण त्याने नकार दिला. शेवटी झालं की...

Video : दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोचा विराट कोहलीला ओळखण्यास नकार, फोटो दाखवताच म्हणाला...
Video : विराट कोहलीला ओळखण्यात दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोचा नकारार्थी सूर, फोटो पाहिल्यानंतर एका झटक्यात सांगितलं की..
| Updated on: Jan 11, 2024 | 2:41 PM

मुंबई : विराट कोहलीची क्रिकेटविश्वात रनमशिन्स म्हणून ख्याती आहे. विराट कोहलीचं फिटनेस आणि धावांची भूक क्रीडाप्रेमींनी पाहिली आहे. त्यामुळे जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. नुकताच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याने सचिनचा 49 शतकांचा विक्रम मोडीत काढला होता. त्यावरूनच विराट कोहली किती महान खेळाडू आहे याचा अंदाज येतो. सोशल मीडियावरही विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यामुळे विराट कोहलीबाबत बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. खासकरून क्रीडाजगतील रसिकांना विराट कोहलीचं नाव परिचयाचं आहे. पण ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डोला विराट कोहलीबाबत विचारलं तर त्याने ओळखत नसल्याचं सांगितलं. पण एक फोटोने स्मरणशक्तीत भर पडली आणि चित्रच बदललं. दिग्गज फुटबॉलपटू आणि यूट्यूबर स्पीडचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओ स्पीड रोनाल्डोला कोहलीबाबत विचारत आहे. पण प्रश्न विचारताच रोनाल्डो बुचकळ्यात पडला आणि ओळखत नसल्याचं सांगितलं.

  • स्पीड- तू विराट कोहलीला ओळखतो का?
  • रोनाल्डो- कोण?
  • स्पीड- विराट कोहली भारतातून
  • रोनाल्डो- नाही
  • स्पीड- खरंच तू विराट कोहलीला ओळखत नाही
  • रोनाल्डो- तो कोण आहे? एक खेळाडू?
  • स्पीड- तो एक क्रिकेटपटू आहे
  • रोनाल्डो- तो इथे फार लोकप्रिय नाही.

वरील संभाषण झाल्यानंतर स्पीडने रोनाल्डोला एक फोटो दाखवला आणि रोनाल्डोच्या डोक्यात प्रकाश पडला. रोनाल्डोने विराटचा फोटो पाहताच ओळखतो असं सांगितलं. यूट्यूबर स्पीडही लोकप्रिय असून वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतात आला होता. त्याचवेळी त्याला विराट कोहली आणि क्रिकेट या दोन्ही बाबींची लोकप्रियता जाणवली होती. त्यामुळे रोनाल्डोने विराट कोहलीला ओळखण्यास नकार दिला तेव्हा स्पीडला आश्चर्याचा धक्का बसला.

विराट कोहलीने 14 महिन्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. पहिल्या टी20 सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. वामिकाचा वाढदिवस असल्याने त्याने पहिल्या सामन्यातून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टी20 सामन्यात विराट कोहलीची फलंदाजी क्रीडारसिकांना पाहता येणार आहे. विराट कोहलीकडे आयपीएलमध्ये आरसीबीचं नेतृत्व सोपवलं जाण्याचीही शक्यता आहे.