AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेंद्रसिंह धोनीचा आयपीएल प्रवास थांबला? चेपॉकवरील फोटोग्राफीनंतर चर्चांना उधाण

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला पराभवासह मोठा धक्का बसला आहे. प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनीने फोटोशूटमुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून निवृत्तीची चर्चा होती. पण अधिकृत काहीच जाहीर झालेलं नाही.

महेंद्रसिंह धोनीचा आयपीएल प्रवास थांबला? चेपॉकवरील फोटोग्राफीनंतर चर्चांना उधाण
महेंद्रसिंह धोनीचा आयपीएल प्रवास थांबला? चेपॉकवरील फोटोग्राफीनंतर चर्चांना उधाणImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 19, 2026 | 12:01 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती जाहीर केल्याची चर्चा रंगली आहे. पण अधिकृतरित्या कुठेच काहीच सांगितलेलं नाही. पण चेपॉक मैदानातील फोटोग्राफीमुळे तशी चर्चा रंगली आहे. चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पाच वेळा जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि धोनी एक समीकरण आहे. 2021 पासून त्याच्या निवृत्तीची चर्चा होती. त्याने 2021 ला एक इच्छाही व्यक्त केली होती. चेपॉकवर शेवटचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तसं काही झालं नाही. आयपीएल 2026 स्पर्धेत सुरूवातीपासूनच त्याला खेळता आलं नाही. दुखापतीमुळे या स्पर्धेत एकही सामना खेळला नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना होता. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र या सामन्यालाही मुकला. पण पहिला डाव संपला आणि धोनीसोबत फोटोसेशन झालं. त्यामुळे या सामन्यानंतर निवृत्ती घेतली असं सोशल मीडियावर चर्चासत्र रंगलं आहे.

पहिल्या डावानंतर महेंद्रसिंह धोनी फोटोशूटसाठी मैदानात उतरला. चेन्नई सुपर किंग्सचा घरच्या मैदानातील 19 व्या मोसमातील शेवटचा सामना असल्याने मैदानात आला. या सामन्यापूर्वी आर अश्विन आणि मोहम्मद कैफने हा शेवटचा सामना असेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण तसं काही झालं नाही. त्यामुळे धोनी सामन्याच्या निकालानंतर निवृत्ती निर्णय जाहीर करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र तसंही झालं नाही. मात्र तो धोनी आहे. त्याने याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाही कल्पना नसताना निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे धोनी सामन्यानंतर निवृत्तीबाबत काही अपडेट देतो का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

महेंद्रसिंह धोनीचं आयपीएल करिअर

महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धेत 278 सामने खेळला आहे. त्याने 38.3 च्या सरासरीने 5439 धावा केल्या आहेत. धोनी आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत 24 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच 264 षटकार मारले आहेत. आतापर्यंत 18 पर्वात महेंद्रसिंह धोनी खेळला. पण 19व्या पर्वात त्याला काही मैदानात उतरता आलं नाही. महेंद्रसिंह धोनीने मागच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व केलं होतं. पण यावेळेस मैदानात उतरलाच नाही.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच