AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: हैदराबादच्या विजयानंतर चेन्नईचं प्लेऑफचं गणित चुकलं, कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 63वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 5 गडी राखून जिंकला. यासह प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या आशांना सुरूंग लागला आहे. 

IPL 2026: हैदराबादच्या विजयानंतर चेन्नईचं प्लेऑफचं गणित चुकलं, कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला...
IPL 2026: हैदराबादच्या विजयानंतर चेन्नईचं प्लेऑफचं गणित चुकलं, कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 18, 2026 | 11:41 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 63व्या सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 20 षटकात 7 गडी गमवून 180 धावा केल्या. तसेच विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं.हे आव्हान गाठताना सनरायझर्स हैदराबादला पावरप्लेमध्येच दणका बसला. त्यामुळे हा सामना त्यांच्या हातून जाईल असं वाटलं. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड स्वस्तात बाद झाले. या दोघांच्या विकेटनंतर हेनरिक क्लासेन आणि इशान किशन यांनी डाव सावरला. या दोघांनी सुरूवातीला सावध फलंदाजी केली. मात्र धावा आणि चेंडू यांच्यातील वाढतं अंतर पाहून फटकेबाजी करत डाव सावरला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सपासून डाव लांब गेला. इशान किशनने इशान किशनने 47 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार मारत 70 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे विजय सोपा झाला.

कर्णधार ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘क्रिकेटचा सामना चांगला झाला. खेळपट्टी चांगली होती, त्यात फारसा बदल केला नाही. काही संधी हुकल्या, पण तरीही मुलांचा अभिमान वाटतो. प्रतिस्पर्धी संघाची विकेट गेल्यानंतर मिळालेल्या संधीचे सोने करणे आवश्यक होते, पण ते जमले नाही. खरं सांगायचं तर, अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. सॅमसन आमच्यासाठी खूप चांगला खेळत आहे. काही महत्त्वाचे खेळाडू संघाबाहेर होते. हे अनेक घटकांवर अवलंबून असते. आज प्रत्येकाने मनापासून प्रयत्न केले, मुलांचा अभिमान वाटतो. चाहते प्रत्येक परिस्थितीत आम्हाला पाठिंबा देतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आमची कामगिरी खूपच चांगली होती.’

सनरायझर्स हैदराबादचा विजय आणि गुजरातचा फायदा

सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना जिंकला आणि 13 सामन्यांनंतर त्यांचे 16 गुण झाले. त्यामुळे आरसीबीनंतर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे संघ पात्र ठरले आहेत. चेन्नईला हरवण्याचा फायदा केवळ हैदराबादलाच नाही, तर गुजरात टायटन्सलाही झाला आहे. गुजरात टायटन्स संघही आपला अंतिम गट फेरीचा सामना खेळण्यापूर्वीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच