Video : मास्टर ब्लास्टर बनला ‘मास्टर शेफ’, सचिनने बनवली फॅमिलीसाठी ‘सीक्रेट डिश’, काय आहे नेमका हा पदार्थ?

| Updated on: Jul 10, 2021 | 1:47 PM

क्रिकेटच्या मैदानावर सचिनचा अप्रतिम खेळ साऱ्यानांच ठाऊक आहे. पण सचिन किचनमध्ये कशी कामगिरी करतो. हे त्यानेच एका व्हिडीओतून स्वत: कूकिंग करत दाखवले आहे.

Video : मास्टर ब्लास्टर बनला मास्टर शेफ, सचिनने बनवली फॅमिलीसाठी सीक्रेट डिश, काय आहे नेमका हा पदार्थ?
सचिन तेंडुलकर कूकिंग करताना
Follow us on

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर धावांचा डोंगर रचनारा सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणजे जगाच्या इतिहासातील एक नंबरचा फलंदाज. अगदी क्रिकेटचा देव अशी उपमा त्याला मिळाल्याने त्याच्या क्रिकेटबद्दल काही सांगण्याची गरज नाही. पण आता सचिनचा क्रिकेटर म्हणून नाही तर ‘मास्टर शेफ’ म्हणून एक अवतार समोर आला आहे. सचिनने त्याच्या फॅमिलीसाठी एक ‘सीक्रेट डिश’ तयार करत त्याचा व्हिडीओ इन्सटाग्रामवर पोस्ट केला आहे. सचिनचा हा व्हिडीओ चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतला असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (Master Blaster Cricketer Sachin Tendulkar Cooks Secret Dish for Family Video Posted On Instagram)

2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला सचिन अधिक काळ परिवारासोबतच घालवताना दिसतो. सध्याही तो आपल्या घरी निवांत वेळ घालवत आहे. अशावेळी त्याने स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी थेट स्वयपांकघरात शिरत कुकिंग करण्याच ठरवलं. याआधीही त्याने अनेकदा विविध पदार्थ बनवल्याचं समोर आलं होत. अशाचप्रकारे त्याने यावेळीही एक डिश तयार करुन फॅमिलीला सरप्राईज देण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे व्हिडीओ ?

सचिनने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तो घरातील किचनमध्ये काहीतरी बनवतना दिसत आहे. सचिनची ही डिश इतकी सीक्रेट आहे की त्यालाही माहित नाही तो काय बनवतोय हे स्वत: त्यानेच म्हटले आहे. तो म्हणतो, “सर्वांसाठी हे एक सरप्राइज आहे. कुणालाच माहित नाही की याठिकाणी काय बनत आहे, मलाही माहित नाही मी काय बनवतो आहे.” विशेष म्हणजे या व्हिडीओच्या शेवटी सचिनने त्याची डिश झाल्याचा आनंद व्यक्त चमचा हातात पकडून दोन्ही हात वर केले. अगदी त्याचप्रकारे ज्याप्रकारे कारकीर्दीतील 100 शतकं ठोकताना प्रत्येकवेळी बॅट पकडून हात वर केले होते.

 

 

हे ही वाचा :

Birthday Special : जन्मानंतर रुग्णालयातच बदली झाला, पुढे जाऊन जगातील महान फलंदाज बनत गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरला, 4 सामन्यांत 774 धावा ठोकणारा भारतीय क्रिकेटपटू

Happy Birthday Sunil Gavaskar : वीरेंद्र सेहवागच्या गावस्करांना हटके शुभेच्छा, मजेशीर व्हिडीओ केला पोस्ट

IND vs ENG Women : भारतीय महिला यष्टीरक्षकाने दाखवला ‘धोनी अवतार’, क्षणार्धात इंग्लंडच्या फलंदाजाला केलं बाद, पाहा Video

(Master Blaster Cricketer Sachin Tendulkar Cooks Secret Dish for Family Video Posted On Instagram)