MI vs SRH Toss : मुंबई टॉसचा बॉस, हार्दिकचा हैदराबादविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Toss : मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये टॉस जिंकला आहे. हार्दिकने विजयी धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे.

MI vs SRH Toss : मुंबई टॉसचा बॉस, हार्दिकचा हैदराबादविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
Hardik Pandya MI vs SRH Toss Ipl 2025
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 17, 2025 | 7:35 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील सातवा सामना आहे. हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबईचं तर पॅट कमिन्सकडे हैदराबादचं नेतृत्व आहे. सामन्याचं आयोजन हे मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. हार्दिकने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता मुंबईच्या गोलंदाजांसमोर हैदराबादच्या स्फोटक फंलदाजांना स्वस्तात रोखण्याचं आव्हान असणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण 23 वेळा आमनासामना झाला आहे. हैदराबाद मुंबईवर वरचढ राहिली आहे. हैदराबादने मुंबईवर 13 वेळा मात केली आहे. तर पलटणने 10 वेळा पलटवार करत हैदराबादचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे आता मुंबई या मोसमातील तिसरा आणि हैदराबादविरुद्धचा 11 वा विजय मिळवणार का? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दोन्ही संघांचा सातवा सामना

दरम्यान मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांची या मोसमातली स्थिती सारखीच आहे. दोन्ही संघांचा हा सातवा सामना आहे. याआधीच्या 6 सामन्यांत मुंबई आणि हैदराबादने प्रत्येकी 4-4 सामने गमावले आहेत. तर हैदराबाद आणि मुंबईला फक्त 2-2 सामनेच जिंकता आले आहेत. तसेच दोन्ही संघांनी आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विश्वास वाढलेला आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणता संघ सलग दुसरा विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

मुंबईच्या बाजूने टॉसचा कॉल

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कॅप्टन), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि एशान मलिंगा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि कर्ण शर्मा.