IND vs PAK: शाहीन आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनला निवडून पाकिस्तानने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली

IND vs PAK: पाकिस्तानसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहेच. पण आता पाकिस्तानने एक निर्णय घेतलाय, त्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढणार आहे.

IND vs PAK: शाहीन आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनला निवडून पाकिस्तानने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली
Mohammed hasnain
Image Credit source: instagram
| Updated on: Aug 22, 2022 | 2:58 PM

मुंबई: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आशिया कप (Asia cup) मध्ये खेळणार नाहीय. दुखापतीमुळे तो स्पर्धेला मुकणार आहे. पाकिस्तानसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहेच. पण आता पाकिस्तानने एक निर्णय घेतलाय, त्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढणार आहे. पाकिस्तानने शाहीन शाह आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनला (Mohammad hasnain) संघात निवडलं आहे. हा खेळाडू पाकिस्तानसाठी अडचणीचा ठरु शकतो.

मोहम्मद हसनैनचा रेकॉर्ड खूपच खराब

मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीत वेग आणि बाऊन्स दोन्ही आहे. पण टी 20 क्रिकेट मध्ये हा गोलंदाज महागडा ठरत आलाय. मोहम्मद हसनैनचा इकॉनमी रेट 7.90 आहे. आजच्या टी 20 क्रिकेटच्या हिशोबाने हा रेट ठीक आहे. पण प्रत्येक मोठ्या संघाविरोधात हसनैनने मार खाल्ला आहे.

मोठ्या टीम्स विरोधात हसनैन मार खातो

वेस्ट इंडिज विरुद्ध मोहम्मद हसनैनचा प्रति षटक इकॉनमी रेट 12.25 आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रति ओव्हर 12.50 इकॉनमी रेट आहे. श्रीलंकेविरुद्ध प्रतिओव्हर 9.50 इकॉनमी रेट आहे. इंग्लंड विरुद्ध प्रतिओव्हर 9 इकॉनमी रेट आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिओव्हर 8 धावा आहे. हसनैनने फक्त झिम्बाब्वे विरुद्ध चांगली कामगिरी केलीय.

गोलंदाजी Action चिंतेचा विषय

हसनैनची गोलंदाजी Action सुद्धा पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे. चुकीच्या Action मुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. सध्या इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड लीग स्पर्धेत त्याच्या गोलंदाजी Action वर मार्क स्टॉयनिसने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

द हंड्रेड मध्येही हसनैनची धुलाई

मोहम्मद हसनैन सध्या इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड स्पर्धेत खेळत आहे. ओव्हल इन्विंसबल संघाकडून खेळणाऱ्या हसनैनची तिथे धुलाई होत आहे. हसनैनने 4 सामन्यात 5 विकेट घेतल्यात. त्याचा प्रतिओव्हर इकॉनमी रेट 11.45 चा आहे. भारतीय फलंदाज हसैननच्या या कमकुवत बाजूचा नक्कीच फायदा उचलतील. भारत आणि पाकिस्तान मध्ये 28 ऑगस्टला आशिया कप स्पर्धेत सामना होणार आहे. आशिया कपचा हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये होईल.