रवींद्र जाडेजासाठी थेट CSK ला भिडला MS Dhoni, सरळ भाषेत मॅनेजमेंटला सांगितला आपण निर्णय

| Updated on: Nov 04, 2022 | 1:15 PM

रवींद्र जाडेजासाठी एमएस धोनीची बॅटिंग

रवींद्र जाडेजासाठी थेट CSK ला भिडला MS Dhoni, सरळ भाषेत मॅनेजमेंटला सांगितला आपण निर्णय
Dhoni-Jadeja
Image Credit source: PTI
Follow us on

चेन्नई: चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासातील दुसरी यशस्वी टीम आहे. यावर्षीच्या आयपीएल सीजनमध्ये रवींद्र जाडेजा आणि चेन्नई सुपर किंग्समधील संबंध खराब झाले. मागच्या 6 महिन्यांपासून फ्रेंचायजी आणि जाडेजामधील मतभेदाच्या बातम्या सातत्याने येत आहेत. आता रवींद्र जाडेजाच्या ट्रान्सफरची बातमी आली आहे. एमएस धोनीला रवींद्र जाडेजा टीममध्ये हवा आहे. त्यासाठी कॅप्टन धोनी थेट सीएसकेच्या फ्रेंचायजीला भिडला.

नेमकं काय घडलं?

यावर्षीच्या आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजाला हंगाम सुरु असताना, कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं. त्याच्याजागी पुन्हा धोनीची नियुक्ती करण्यात आली होती. सोशल मीडियावरील घडामोडींमुळे सुद्धा रवींद्र जाडेजा आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये पटत नसल्याच स्पष्ट झालं. आयपीएलचा सीजन सुरु असतानाच रवींद्र जाडेजाने दुखापतीमुळे माघार घेतली होती.

जाडेजा सीएसकेमध्ये राहणार

सीएसके आता आयपीएलच्या पुढच्या सीजनची तयारी करतेय. 15 नोव्हेंबर ट्रान्सफरची शेवटची तारीख आहे. आता फ्रेंचायजी जाडेजाला ट्रान्सफर करणार नाही, असं दिसतय. कारण धोनी जाडेजाला टीममध्ये ठेवण्यासाठी आग्रही आहे.

मॅनेजमेंटला धोनीने सरळ सांगितलं

माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला जाडेजाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. धोनीने सीएसकेच्या मॅनेजमेंटला स्पष्ट केलय की, जाडेजाला रिलीज केलं जाऊ शकत नाही. तो टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. कुठलाही खेळाडू जाडेजाची जागा भरुन काढू शकत नाही, असं धोनीच मत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

जाडेजा सीएसकेच्या संपर्कात नाहीय

मीडिया रिपोर्ट्सनुसार जाडेजा बऱ्याच काळापासून सीएसके मॅनेजमेंटच्या संपर्कात नाहीय. दुखापतीमुळे जाडेजा 2 मॅच खेळल्यानंतर आशिया कप 2022 मधून बाहेर गेला. दुखापतीमुळेच तो ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये खेळू शकला नाही.