Dhoni retires : तेच गाणं, तेच क्षण अन् चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी, धोनीची पुन्हा एकदा भावनिक पोस्ट!

महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भावुक केलं आहे. या व्हिडिओला दिलेलं कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. काय लिहिलंय माहीने?

Dhoni retires : तेच गाणं, तेच क्षण अन् चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी, धोनीची पुन्हा एकदा भावनिक पोस्ट!
dhoni retirement
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 8:33 PM

महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भावुक केलं आहे. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या माजी कर्णधाराने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील काही खास क्षणांचा व्हिडिओ शेअर केला. विशेष म्हणजे, या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला त्याने ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ हेच गाणं ठेवलं आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाही धोनीने याच गाण्याचा वापर केला होता. त्यामुळे त्याच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

धोनीच्या कॅप्शननेही वेधलं लक्ष

हा व्हिडिओ शेअर करताना धोनीने लिहिलेलं कॅप्शनही विशेष चर्चेत आलं आहे. चाहत्यांच्या प्रेमाचा उल्लेख करत त्याने मजेशीर अंदाजात लिहिलं, “चाहत्यांनी मला चुकीचं ठरवलं. मात्र, आपली चूक मान्य करण्यासाठी यापेक्षा चांगलं गाणं असूच शकत नाही. कदाचित या गाण्याच्या दोन व्हर्जन यासाठीच तयार करण्यात आल्या असाव्यात, जेणेकरून मी चूक करू शकेन आणि नंतर ती मान्यही करू शकेन.”

Loading...

धोनीचा हा व्हिडिओ काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. चाहत्यांनी कमेंट्समधून त्याच्यावरील प्रेम व्यक्त केलं. अनेकांनी धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीला सुवर्णयुग म्हटलं, तर चेन्नई सुपर किंग्ससाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले. त्याच्या नेतृत्वाखाली मिळालेले विजय आणि मैदानावरील अविस्मरणीय क्षणांचीही चाहत्यांनी आठवण करून दिली.

 

व्हिडिओत कोणते खास क्षण?

धोनीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळतात. युवराज सिंगने एका ओव्हरमध्ये मारलेले सहा षटकार, सचिन तेंडुलकरचे ऑस्ट्रेलियातील पहिले वनडे शतक आणि त्याचे वनडेतील द्विशतक अशा खास क्षणांचा यात समावेश आहे.

याशिवाय रोहित शर्माचे द्विशतक, विराट कोहलीने वनडेमध्ये पूर्ण केलेल्या 10 हजार धावा आणि आयपीएलमधील काही अविस्मरणीय क्षणही धोनीने या व्हिडिओतून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यामुळे धोनीच्या या पोस्टमधून केवळ त्याच्या कारकिर्दीतील आठवणीच नाही, तर क्रिकेटच्या अनेक सुवर्णक्षणांनाही उजाळा मिळाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us