Dhoni : माही बस नाम काफी है | वर्ल्ड कप 2023 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

MS Dhoni : टीम इंडियाने शेवटचा वर्ल्ड कप 2011 साली म्हणजेच 12 वर्षांअगोदर जिंकला होता. परत एकदा ट्रॉफीवर नाव कोरण्याची नामी संधी आहे.

Dhoni : माही बस नाम काफी है | वर्ल्ड कप 2023 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
| Updated on: Jun 21, 2023 | 9:37 PM

मुंबई : टीम इंडियाकडे आयसीसीच्या दोन्ही ट्रॉफीवर नाव कोरण्याची मोठी संधी आहे. टीम इंडियासाठी आयसीसीच्यास दोन्ही ट्रॉफीवर नाव कोरण्याची मोठी संधी आहे. यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसुद्धा पाहायला मिळणार आहे. क्रिकेट वर्ल्ड कपच्या थराराला काही महिने बाकी आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा सुरू होणार आहे. टीम इंडियाने शेवटचा वर्ल्ड कप 2011 साली म्हणजेच 12 वर्षांअगोदर जिंकला होता. परत एकदा ट्रॉफीवर नाव कोरण्याची नामी संधी आहे.

महेंद्र सिंह धोनीवर सोपवली जाणार जबाबदारी?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला अनुभवी महेंद्रसिंग धोनी याच्यावर बीसीसीआयकडून मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 3 ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत.  यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धोनीला मेंटर म्हणून संघात घेतलं जाण्याची शक्यता आहे.

माहीच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असणार आहे. धोनीला यापूर्वी 2021 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान टीम इंडियाचा मेंटर बनवण्यात आलं होतं. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल आणि युवा खेळाडू सामन्याचा जास्ता दबाव घेणार नाहीत. आयपीएलमध्ये आपण पाहिलं असले की युवा खेळाडूंना घेऊन धोनीने यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

यंदाच्या सीझनमधील ट्रॉफी जिंकत आयपीएलमध्ये सर्वाधिक पाचवेळा ट्रॉफीवर नाव कोरणारा सीएसके दुसरा संघ ठरला आहे. 2011 चा वर्ल्ड कपही भारतामध्ये झाला होता आणि यंदाचाही वर्ल्ड कप  भारतात होणार असल्याने बीसीसीआय धोनीला  परत एकदा संघामध्ये मेंटॉर म्हणून घेऊ शकतं.

दरम्यान, टीम इंडियाने 2013 साली शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तीसुद्धा धोनीच्याच नेतृत्त्वाखाली मिळवली होती. त्यानंतर टीम इंडियाला एकदाही मोठी स्पर्धा जिंकण्यात यश आलं नाही.