AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : ‘मला माहित आहे वर्ल्ड कप कसा जिंकतात, फक्त संघात घ्या’; स्टार खेळाडूची मागणी!

मला आयसीसी टूर्नामेंट्समध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असून संघात निवड केली जावी, अशी मागणी वेगवान गोलंदाजाने केली आहे. त्यामुळे त्याला संघात परत घेतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

World Cup 2023 : 'मला माहित आहे वर्ल्ड कप कसा जिंकतात, फक्त संघात घ्या'; स्टार खेळाडूची मागणी!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 21, 2023 | 6:42 PM
Share

मुंबई : यंदाच्या वनडे वर्ल्ड कप 2023 साठी सर्व संघ तयारीला लागले असून टीम मॅनेजमेंट संघ बांधणी करत आहे. 2011 नंतर म्हणजेच 12 वर्षांनी भारतात आयसीसी वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कप संघामध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही अनुभवी खेळाडूही आता संघाच्या बाहेर आहेत त्यांनाही आता संघात जागा मिळवण्यासाठी हातपाय हलवावे लागणार आहेत. अशातच पाकिस्तान संघाच्या खेळाडूने संघातील निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला हसन अली?

मला आयसीसी टूर्नामेंट्समध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. यामुळे मला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी काय करावे लागतं हे माहित आहे. मी 29 वर्षांचा झालो असलो तरी, माझा फिटनेस चांगला असून मी दमदार कामगिरी करण्यास सज्ज असल्याचं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने म्हटलं आहे.

पाकिस्तानला 2017 साली चॅम्पियन ट्रॉफी  जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हसन अलीच्या या वक्तव्याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे. चॅम्पियन ट्रॉफीत हसन अलीने सर्वाधिक 13 विकेट घेतल्या होत्या.  पाकिस्तानकडून खेळताना त्याने 60 वनडे सामन्यांमध्ये 91 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तान संघात सरस गोलंदाजांची फौजच आहे. नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रऊफ सारखे चांगल्या फॉर्ममध्ये असलेले गोलंदाज असताना हसन अलीचे टीममध्ये पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे.

भारताच्या 12 शहरामंध्ये विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 10 संघ मैदानात उतरणार आहेत. 3 नॉकआउट सामन्यांसह एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. नुकतेच आयसीसीने (ICC) वनडे वर्ल्ड कप 2023 चा लोगो प्रसिद्ध केला. हा लोगो ‘नवरसा’ च्या रुपात दाखवला आहे. हे नवरस म्हणजेच सम्मान, आनंद, आश्चर्य, शौर्य, दुःख, सामर्थ्य, अभिमान, गौरव, उत्कटता हे आहेत.

दरम्यान, भारतामध्ये वर्ल्ड कप होणार असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित अँड  कंपनीसाठी मोठी संधी असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंवर टीम इंडियाची मदार असणार आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल