AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team india : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात ‘या’ 3 खेळाडूंचं करिअर बर्बाद, एकतर विराटचा खास!

Rohit Sharma Captaincy : येत्या आशिया कपध्ये रोहितला मोठी संधी असून टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी मिळवून देण्याची संधी आहे. रोहितच्या नेतृत्त्वामध्ये काही खेळाडूंचं करिअर संपल्यात जमा झालं आहे. 

Team india : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 'या' 3 खेळाडूंचं करिअर बर्बाद, एकतर विराटचा खास!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 21, 2023 | 3:41 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावरून अनेक दिग्गजांनी त्याच्यावर निशाणा साधलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. माजी कर्णधार विराट कोहली याला आयसीसी ट्रॉफी जिंकता आल्या नाहीत. त्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्त्व सोपवण्यात आलं होतं. मात्र त्यालाही आपल्या नेतृत्त्वामध्ये विशेष छाप पाडता आली नाही. आता येत्या आशिया कपध्ये रोहितला मोठी संधी असून टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी मिळवून देण्याची संधी आहे. रोहितच्या नेतृत्त्वामध्ये काही खेळाडूंचं करिअर संपल्यात जमा झालं आहे.

कोण आहे ते खेळाडू?

रोहित शर्मा याच्याकडे नेतृत्त्व गेल्यावर स्टार खेळाडू  युजवेंद्र चहल याला संघात स्थान मिळालं नाही. टीम इंडियाचा मुख्य फिरकीपटू असलेल्या चहलला नंतर संघात काही स्थान मिळालं नाही. विराट कोहली याचा हुकमी एक्का असलेल्या चहलला टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये त्याचा स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला नव्हता.  न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धवनने चहलला त्याच्या नेतृत्वाखाली संधी दिली, ज्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. 32 वर्षांचा असलेल्या चहलने आतापर्यंत 72 वनडे आणि 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. चहलने आातापर्यंत कसोटीमध्ये पदार्पण केलेलं नाही.

युजवेंद्र चहल याच्यानंतर दुसरा खेळाडू म्हणजे रवी बिष्णोई आहे. रवीला फरा काही संधी मिळाली नाही, ज्या-ज्या वेळी त्याल्या संधी मिळाली तेव्हा त्याने सिद्ध करून दाखवलं आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला रवीने आऊट केलं होतं. एकंदरित त्याला येत्या काही दिवसांमध्ये संधी मिळाली नाहीतर हा खेळाडू क्रिकेटपासून दूर जावू शकतो.

मुंबई इंडिअन्सचा हुमकी एक्का असलेला झारखंडचा खेळाडू ईशान किशन आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या पॉवर हिंटिंगच्या जोरावर त्याने अनेकवेळा मुंबईला चांगली सुरूवात करून दिली आहे. ईशानची वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल सामन्यासाठी निवड झाली होती. मात्र रोहित शर्मा याने त्याला संधी न देता के एस भरत याला संधी दिली होती. वर्ल्ड कप 2023 मध्ये त्याला संघात स्थान मिळतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत