महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्समधून बाहेर, मुंबई इडियन्समधून खेळणार? फोटोमुळे चर्चांना उधाण

महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलवर लक्ष केंद्रीत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबत त्याने आपला खेळ सुरु ठेवला आहे. आता आयपीएल 2026 स्पर्धेत खेळणार की नाही गुलदस्त्यात आहे. मात्र त्याच्या एका फोटोने सोशल मीडियावर रान उठलं आहे.

महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्समधून बाहेर, मुंबई इडियन्समधून खेळणार? फोटोमुळे चर्चांना उधाण
महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्समधून बाहेर, मुंबई इडियन्समधून खेळणार? फोटोमुळे चर्चांना उधाण
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Oct 07, 2025 | 7:15 PM

चाळीशी पार केलेल्या महेंद्रसिंह धोनीचा क्रिकेटमध्ये अजूनही बोलबाला आहे. मैदानात उतरला की चाहत्यांचा जल्लोष होतो. त्याची खेळी पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. एक दोन चेंडू खेळताना पाहीलं तर चाहत्यांचं समाधावन होतं. पण महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2026 स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यातच महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. चाहते याबाबत वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला धोनीचा फोटो एका फुटबॉल सामन्यातला आहे. यात महेंद्रसिंह धोनी जर्सी परिधान केली आहे. त्यावर मुंबई इंडियन्सचा लोगो आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये अफवांचं पेव फुटलं आहे.

महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सर्वश्रूत आहे. पहिल्या पर्वापासून धोनी या फ्रेंचायझीसोबत आहे. मधल्या काळात फ्रेंचायझीवर बॅन टाकल्याने पुणे वॉरियर्सकडून खेळला होता. पण आता महेंद्रसिंह धोनीच्या पांढऱ्या जर्सीवर निळ्या रंगात मुंबई इंडियन्सचा लोगा स्पष्ट दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमधील प्रतिस्पर्धी आहेत. त्यात धोनीला मुंबईच्या लोगोसह जर्सीत पाहिल्याने चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. त्यामुळे चर्चांच्या गरम आगीत तेल ओतलं गेलं आहे. आतापर्यंत या व्हायरल फोटोवर कोणीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. महेंद्रसिंह धोनी असो की, चेन्नई सुपर किंग्स किंवा मुंबई इंडियन्स यापैकी कोणीच यावर भाष्य केलेलं नाही.

महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 2020 मध्ये रामराम ठोकला होता. त्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेईल असं सांगितलं जात होत. पण त्यानंतर धोनी आणखी चार पर्व खेळला. एकदा जेतेपदावर नावंही कोरलं. धोनी आता 44 वर्षांचा झाला आहे आणि पुढच्या पर्वात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. धोनी पुढच्या पर्वात खेळणार की नाही याबाबत डिसेंबरमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसंही मेगा लिलावात अनकॅप्ड प्लेयर म्हणून उतरला होता.