Mumbai Indians च्या बॅट्समनच टी 20 मध्ये तुफानी शतक, फक्त Six, Four ने बनवल्या 130 रन्स VIDEO

समोरच्या गोलंदाजांची नुसती धुलाई केली, बॉल कुठे टाकायचा? गोलंदाजांना पडला प्रश्न

Mumbai Indians च्या बॅट्समनच टी 20 मध्ये तुफानी शतक, फक्त Six, Four ने बनवल्या 130 रन्स VIDEO
Dewald Brevis
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 01, 2022 | 4:15 PM

डरबन: बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने तुफानी शतक ठोकलय. त्याने सीएसए टी20 चॅलेंज स्पर्धेत फक्त फोर, सिक्सनेच 130 धावा केल्या. टी 20 चॅलेंजंमध्ये टायटन्सकडून खेळताना त्याने नाइट्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 57 चेंडूत 162 धावा फटकावल्या. टी 20 क्रिकेटमध्ये ब्रेविसच हे पहिलं शतक आहे. त्याने आपलं मेडन शतक फक्त 35 चेंडूत पूर्ण केलं. त्याने आपल्या तुफानी इनिंगमध्ये 13 चौकार आणि 13 षटकार ठोकले.

बेबी एबीच्या तुफानाच्या बळावर टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट गमावून 20 ओव्हर्समध्ये 271 धावा फटकावल्या.

तिसरी मोठी धावसंख्या

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक व्यक्तीगत स्कोरचा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून पुणे वॉरियर्स विरुद्ध नाबाद 175 धावा फटकावल्या होत्या. या यादीत दुसरं नाव एरॉन फिंचच आहे. 2018 साली झिम्बाब्वे विरुद्ध फिंच 76 चेंडूत 172 धावांची इनिंग खेळला होता.

डिविलियर्सकडून कौतुक

ब्रेविसच्या या इनिंगवर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सनेही त्याचं कौतुक केलय. ब्रेविस डिविलयर्सचा मोठा फॅन आहे. नेहमीच मी डिविलियर्सच्या बॅटिंगचे व्हिडिओ बघतो. फलंदाजीला जाताना नेहमी ही गोष्ट माझ्या लक्षात असते. डेवाल्ड ब्रेविसच्या फलंदाजीच्या स्टाइलवरुनच त्याला बेबी एबी हे नाव पडलं आहे. त्याच्या बॅटिंगमध्ये एबी डिविलियर्सची झलक दिसते.

ब्रेविस मुंबई इंडियन्सचा भाग
डेवाल्ड ब्रेविस आयपीएलमधला यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा भाग आहे. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये ब्रेविसने आपली क्षमता दाखवून दिली. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये त्याला 3 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मुंबईकडून 7 मॅच खेळताना त्याने 161 धावा केल्या. टायटन्सकडून ब्रेविसशिवाय जीवेशन 52 आणि डोनावोनने 15 चेंडूत 33 धावा फटकावल्या.