
आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणाऱ्या खेळाडूची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री झाली आहे. कोलकातासाठी खेळणाऱ्या क्विंटन डी कॉक याला गूड न्यूज मिळाली आहे. मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क फ्रँचायजीने अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामासाठी क्विंटन डी कॉकला आपल्या गोटात घेतलं आहे. क्विंटन डी कॉक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. मात्र डी कॉक जगभरात होणाऱ्या अनेक लीग स्पर्धेत खेळतो.
दमदार खेळाच्या जोरावर क्विंटन डी कॉक मालामाल झाला आहे. डी कॉकने आयपीएलमध्ये नाव कमावलं आहे. क्विंटनने आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिट्ल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्सं प्रतिनिधित्व केलं आहे. तर केकेआरने क्विंटनला यंदाच्या मोसमसाठी 3.6 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
क्विंटन डी कॉकची पत्नी चियरलीडर्स होती. डी कॉकची पत्नी 2012 साली चॅम्पियन्स लीगमध्ये परफॉरमन्स करताना दिसली होती. तेव्हाच क्विंटनला साशा आवडली. त्यानंतर दोघेही सोशल मीडियाद्वारे जोडले गेले. त्यानंतर दोघेही विवाहबद्ध झाले. दोघांना एक मुलगीही आहे.
क्विंटन डी कॉकने टी 20 क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. क्विंटन डी कॉकने 382 टी 20 सामन्यांमध्ये 10 हजार 790 धावा केल्या आहेत. क्विंटन डी कॉक याने या दरम्यान 7 शतकं आणि 69 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच क्विंटन डी कॉकने 140 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत.
क्विंटन डी कॉकची मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क टीममध्ये एन्ट्री
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨
Inaugural champions MI New York sign South African wicketkeeper-batter Quinton de Kock for the upcoming MLC Season 3 in the USA 🧤💙🇺🇸#MLC #MINewYork #QuintondeKock #USA #Sportskeeda pic.twitter.com/lFyMB5pKG3
— Sportskeeda (@Sportskeeda) April 3, 2025
दरम्यान क्विंटन डी कॉक याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 6 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. डी कॉकने आयपीएलमध्ये 111 सामन्यांमध्ये 134.32 स्ट्राईक रेटने आणि 31.35 च्या सरासरीने 3 हजार 260 केल्या आहेत. डी कॉकने या दरम्यान 24 अर्धशतकं झळकावली आहेत.