श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवची संघात एन्ट्री, अचानक टीम बदलली; कारण..

टी20 मालिका संपल्यानंतर सर्वांना वेध लागले आहेत ते वनडे मालिकेचे.. वनडे मालिकेत सूर्यकुमार यादवला स्थान मिळालं नाही. पण ऐनवेळी श्रेयस अय्यरच्या जागी टीममध्ये एन्ट्री झाली आहे. उपांत्यपूर्व फेरीसाठी संघाची घोषणा झाली असून त्यात सूर्यकुमार यादवला स्थान मिळालं आहे.

श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवची संघात एन्ट्री, अचानक टीम बदलली; कारण..
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 03, 2025 | 9:29 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये आठ संघ आमनेसामने येणार आहे. जम्मू काश्मीरने साखळी फेरीत बडोद्याला पराभूत केलं आणि मुंबईचं उपांत्य फेरीत स्थान पक्कं झालं. रणजी स्पर्धेत मुंबईचा सामना हरियाणाशी होणार आहे. हा सामना लाहली क्रिकेट मैदानात होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या सामन्यासाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या सामन्यासाठी पुन्हा एकदा पृथ्वी शॉला डावलण्यात आलं आहे. तर श्रेयस अय्यरला मुंबईच्या संघात मिळालं नाही. त्याचं कारण म्हणजे त्याची इंग्लंड विरूद्धच्या वनडे मालिकेत निवड झाली आहे.श्रेयस अय्यरने आतापर्यंत खेळलेल्या रणजी स्पर्धेत 480 धावांचे योगदान दिले होते. पण उपांत्यपूर्व सामना खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी संघात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली आहे. उपांत्यपूर्व फेरीत मुंबईपुढे हरियाणाला पराभूत करण्याचं आव्हान आहे. कारण दिग्गज संघ असला तरी साखळी फेरीत जम्मू काश्मीर संघाने पराभवाची धूळ चारली होती हे विसरून चालणार नाही. उपांत्यपूर्व फेरीचा सामना 8 फेब्रुवारीपासून असणार आहे.

मुंबईने रणजी ट्रॉफीच्या या पर्वात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. फक्त एकाच पराभवाला सामोरं जावं लागलं. ते पण रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल या सारख्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असताना जम्मू काश्मीरने पराभूत केलं. या व्यतिरिक्त मुंबईने बडोद्याला 84 धघावांनी , महाराष्ट्र संघाला 9 विकेटने, त्रिपुराविरूद्धचा सामना ड्रॉ, ओडिशाला एक डाव आणि 103 धावांनी पराभूत केलं. तर सर्व्हिसेस विरुद्धचा सामना मुंबईने 9 विकेटने जिंकला. तर मेघालयला मुंबईने एक डाव आणि 456 धावांनी पराभूत केलं.

रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबईची टीम

अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकल, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेड्गे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटियान, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉस्टन डियास, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.