BCCI ने कोणाचा केला ‘गेम’? रोहित शर्माच्या वादात नवा ट्विस्ट, इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान काय घडलं?

रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार नाही, अशा वावड्या इंग्लंड दौऱ्यात उडाल्या होत्या. मात्र त्यानंतर बीसीसीआयला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. आता या प्रकरणात एक नाव ट्विस्ट आला आहे.

BCCI ने कोणाचा केला गेम? रोहित शर्माच्या वादात नवा ट्विस्ट, इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान काय घडलं?
BCCI ने कोणाचा केला 'गेम'? रोहित शर्माच्या वादात नवा ट्विस्ट, इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान काय घडलं?
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 05, 2026 | 6:51 PM

भारतीय क्रिकेटविश्वात गेल्या काही दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पराभवाची नामुष्की ओढावली. त्यामुळे भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. त्याबरोबर काही वाद आणि त्यावर स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे. या वादात सर्वात मोठा धुराळा उडाला तो रोहित शर्माच्या शेवटच्या सामन्याचा.. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका सुरू असताना या वावड्या उठल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयला या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या दाव्यानुसार, बीसीसीआयच्या अशा भूमिकेमुळे निवड समितीला विश्वासघात झाल्यासारखं वाटत आहे. कारण रोहित शर्माबाबत सर्वकाही ठरवून केलं होतं. पण बीसीसीआयने युटर्न घेतल्याने निवड समितीची नाचक्की झाली आहे.

बीसीसीआयमध्ये नवा वाद काय?

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, निवड समितीने रोहित शर्माला सर्व काही स्पष्टपणे सांगितलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर संघाचा भाग नसेल असं सांगून ठेवलं होतं. इतकंच काय तर एका निवडकर्त्यांने या विषयावर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडेही याबाबत म्हणणं मांडलं होतं. रोहित शर्मा संघात असेपर्यंत संघ वनडे वर्ल्डकप 2027 जिंकू शकणार नाही, यावर संघ व्यवस्थापनाचं एकमतही झालं होतं. असं सर्व पडद्यामागे घडत असताना कार्डिफमधील दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा फेल गेला आणि लॉर्ड्सवर रोहित शर्माचा शेवटचा सामना होणार या बातम्या झळकल्या. एका मिडिया रिपोर्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. त्यामुळे वाद आणखी उफाळून आला. वाद वाढत असल्याचं पाहून बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. रोहित शर्मा खेळत राहणार, असं त्यांनी सांगितलं.

वृत्तानुसार, बीसीसीआयने अचानक भूमिका बदलल्याने निवड समिती नाराज झाली आहे. बीसीसीआयने युटर्न घेतल्याने विश्वासघात केल्यासारखी भावना निवड समितीच्या गोटात आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि निवड समिती यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं वृत्तात सांगितलं आहे. त्याचा परिणाम येत्या काही दिवसात दिसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. इतकंच काय तर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचं पदही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us