न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय, पुरुषांइतकच महिला क्रिकेटपटूना वेतन मिळणार

| Updated on: Jul 05, 2022 | 2:09 PM

जागतिक क्रिकेट मध्ये न्यूझीलंडक्रिकेट बोर्डाने (New zeland Cricket) समानतेचा पायंडा घालून देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय, पुरुषांइतकच महिला क्रिकेटपटूना वेतन मिळणार
nzc
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: जागतिक क्रिकेट मध्ये न्यूझीलंडक्रिकेट बोर्डाने (New zeland Cricket) समानतेचा पायंडा घालून देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे न्यूझीलंड मध्ये महिला (Women cricketers) आणि पुरुष क्रिकेटपटुंना समान वेतन मिळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट आणि खेळाडू संघटनेत पाच वर्षांसाठी ऐतिहासिक करार झाला आहे. न्यूझीलंडची राष्ट्रीय महिला क्रिकेट टीम आणि देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंना क्रिकेटचे सर्व फॉर्मेट आणि स्पर्धांमध्ये पुरुषांइतकेत समान वेतन (Equal payment) मिळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, टॉप रँकिंग असलेल्या वाइट फर्नला वर्षाला सर्वाधिक 1 लाख 63 हजार 246 डॉलर मिळतील. ही रक्कम आधी 83 हजार 432 डॉलर होती. नवव्या रँकिंगच्या खेळाडूला 1 लाख 48 हजार 946 डॉलर आणि 17 व्या नंबरच्या खेळाडूला 1 लाख 42 हजार 346 डॉलर मिळतील.

किती पैसे मिळणार?

टॉप रँकिंग मध्ये असलेल्या देशांतर्गत महिला क्रिकेटपटूला सर्वाधिक 19 हजार 146 डॉलर, सहाव्या रँकिंगच्या खेळाडूला 18 हजार 646 डॉलर, 12 व्या नंबरच्या खेळाडूला 18 हजार 146 डॉलर मिळतील.

हा एक चांगला निर्णय

“आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंसाठी हा एक चांगला निर्णय आहे. त्यांना पुरुषांइतकं समान वेतन मिळतय” असं न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार सोफी डिवाइन या निर्णयानंतर म्हणाली. “प्रगतीच्या दिशेने टाकलेलं हे एक पाऊल आहे. या मुळे महिला, युवती क्रिकेट खेळाकडे अधिक आकर्षित होतील” असं न्यूझीलंच्या पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार केन विलियमसन म्हणाला.