कसोटी सामन्याच्या एका डावात 10 विकेट घेणाऱ्या एजाज पटेलचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सत्कार

न्यूझीलंडचा एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वच्या सर्व 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ही कामगिरी केली.

कसोटी सामन्याच्या एका डावात 10 विकेट घेणाऱ्या एजाज पटेलचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सत्कार
Ajaz Patel felicitated by Mumbai Cricket Association

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका आज संपली आहे. उभय देशांमध्ये गेल्या आठवड्यात कानपूर येथे आणि आता मुंबई येथे असे दोन कसोटी सामने खेळवण्यात आले. कानपूरचा कसोटी सामना ड्रॉ झाला. मात्र मुंबई कसोटीत भारताने न्यूझीलंडवर 372 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात न्यूझीलंडच्या एका गोलंदाजांन विश्वविक्रमी कामगिरी केली. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने कसोटी सामन्याच्या एका डावात 10 गडी बाद करण्याची किमया केली. अशी कामगिरी करणारा एजाज हा जगातील तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (MCA) गौरव करण्यात आला. (Ajaz Patel felicitated by Mumbai Cricket Association For taking 10 wickets in an innings in Test match)

मुबंई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी कसोटी सामना संपल्यानंतर एजाज पटेलचा सत्कार केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्याची धावपत्रिका आणि स्मृतिचिन्ह देऊन एजाज पटेलचा एमसीएने सन्मान केला. एजाज पटेलनेही 10 गडी बाद केलेला ऐतिहासिक चेंडू आणि आपली सामन्यात वापरलेली जर्सी आठवण म्हणून MCA कडे सुपूर्द केली. एजाज पटेलचा जन्म मुंबईचा आहे. 8 वर्षांचा असताना तो पालकांसह न्यूझीलंडला गेला आणि आता न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळत आहे.

एजाज पटेलचे 10 बळी

न्यूझीलंडचा एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वच्या सर्व 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ही कामगिरी केली. त्याच्या आधी इंग्लंडचा जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळे या दोघांनी ही कामगिरी केली आहे. हे काम जिम लेकरने जुलै 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. त्याचवेळी कांबुळेने हा विक्रम फेब्रुवारी 1999 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केला होता. एजाजने या डावात 47.5 षटकं गोलंदाजी केली. यापैकी 12 षटकं त्याने निर्धाव टाकली आणि 119 धावा देत 10 बळी घेतले.

मुंबईत जन्म

एजाजला मुंबईबद्दल एक वेगळीच ओढ असल्याचे दिसते. त्यांचा जन्मही याच शहरात झाला आहे. एजाजचा जन्म 21 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईतच झाला होता. तो आठ वर्षांचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडला जाऊन स्थायिक झाले होते आणि तेव्हापासून ते या देशातील रहिवासी आहेत.

घरच्या मैदानावर विकेटचा दुष्काळ

एजाजच्या कारकिर्दीतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला न्यूझीलंडमध्ये विकेट्सचं खातंदेखील उघडता आलेलं नाही. न्यूझीलंडमध्ये हा खेळाडू आतापर्यंत तीन सामने खेळला असून तीनही सामन्यांमध्ये त्याला विकेट घेता आलेली नाही. मात्र देशाबाहेर त्याने त्याचा जलवा दाखवला आहे. एजाज उपखंडात खूप यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

इतर बातम्या

IND vs NZ : टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, किवी संघाने हिरावलेलं पहिलं स्थान परत मिळवलं

ND vs NZ, 2nd Test : मयंकचं शतक, अश्विन-जयंतचे ‘चौकार’, मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय

IND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं?


(Ajaz Patel felicitated by Mumbai Cricket Association For taking 10 wickets in an innings in Test match)

Published On - 3:21 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI