IND vs NZ : टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, किवी संघाने हिरावलेलं पहिलं स्थान परत मिळवलं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे

Updated on: Dec 06, 2021 | 11:24 AM

मुंबई कसोटीतील विजयासह टीम इंडिया कसोटी क्रिकेटमधील नंबर वन टीम बनली आहे. भारताने न्यूझीलंडकडून त्यांचे अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे.

IND vs NZ : टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, किवी संघाने हिरावलेलं पहिलं स्थान परत मिळवलं
Virat Kohli

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 325 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या न्यूजीलंच्या संघाला भारताने अवघ्या 62 धावांत रोखलं. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारताच्या फलंदाजांनी 7 बाद 276 धावांवर डाव घोषित केली. आणि न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान न्यूझीलंडच्या संघाला पेलवलं नाही. न्यूझीलंडच्या संघ दुसऱ्या डावात 167 धावांमध्ये ऑल आऊट झाला. त्यामुळे भारताने मुंबई कसोटी 372 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. तसेच भारताने ही मालिका 1-0 अशी खिशात घातली आहे. (India become number 1 test team in ICC test rankings after Mumbai test win against New Zealand)

मुंबई कसोटीतील विजयासह टीम इंडिया कसोटी क्रिकेटमधील नंबर वन टीम बनली आहे. भारताने न्यूझीलंडकडून त्यांचे अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे. किवी संघाने जून 2021 मध्ये भारताकडून ही जागा हिरावून घेतली होती आणि त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून आपले स्थान पक्के केले होते. पण आता टीम इंडियाने कमबॅक केलं आहे. मात्र, आयसीसीकडून याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. आयसीसी दर बुधवारी आपली क्रमवारी अपडेट करते. त्यानंतरच क्रमवारीतील बदल दिसून येतो.

कसोटी क्रिकेटवर भारताचं वर्चस्व

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिका सुरू झाली तेव्हा न्यूझीलंडचा संघ 126 रेटिंगसह पहिल्या स्थानावर होता. त्याच वेळी भारताचे 119 रेटिंग गुण होते. कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्याने किवी संघाला या मालिकेत फायदा झाला, मात्र मानांकनात तोटा झाला. मुंबई कसोटीतील पराभवानंतर त्यांच्या नंबर वन राहण्याच्या आशा संपल्या आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या 108 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि इंग्लंड 107 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. या दोघांपैकी जो कोणी अॅशेस मालिका जिंकेल तो क्रमवारीत वर येईल.

2009 मध्ये भारत पहिल्यांदाच कसोटीत नंबर वन बनला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हे यश मिळवले. यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटीत वेगळे स्थान मिळवले आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत सतत अव्वल स्थानावर राहिला आहे आणि कसोटी क्रिकेटवरील आपली सत्ता मजबूत करत आहे. आता पुन्हा एकदा भारत नंबर एकवर पोहोचला आहे.

इतर बातम्या

ND vs NZ, 2nd Test : मयंकचं शतक, अश्विन-जयंतचे ‘चौकार’, मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय

पाकिस्तान दौऱ्यातून कायरन पोलार्डची माघार; वनडे आणि T20 मालिकेत दोन वेगवेगळे कर्णधार

IND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं?

(India become number 1 test team in ICC test rankings after Mumbai test win against New Zealand)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI