पाकिस्तान दौऱ्यातून कायरन पोलार्डची माघार; वनडे आणि T20 मालिकेत दोन वेगवेगळे कर्णधार

पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे व्हाईट बॉल क्रिकेट टीमचा नियमित कर्णधार कायरन पोलार्ड याने आपले नाव दौऱ्यातून मागे घेतले आहे.

पाकिस्तान दौऱ्यातून कायरन पोलार्डची माघार; वनडे आणि T20 मालिकेत दोन वेगवेगळे कर्णधार
Kieron Pollard

मुंबई : पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे व्हाईट बॉल क्रिकेट टीमचा नियमित कर्णधार कायरन पोलार्ड याने आपले नाव दौऱ्यातून मागे घेतले आहे. पोलार्डला टी-20 विश्वचषकादरम्यान हॅमस्ट्रिंगची इंज्युरी झाली होती, ज्यातून तो अद्याप सावरलेला नाही. क्रिकेट वेस्ट इंडिजच्या निवड समितीने एकदिवसीय संघात पोलार्डच्या जागी डेव्हॉन थॉमसला संधी दिली आहे. तर रोव्हमॅन पॉवेलचा टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. (Kieron Pollard not available for Pakistan tour amid injury)

दुखापतीमुळे पाकिस्तान दौऱ्यातून बाहेर पडलेला पोलार्ड त्रिनिदादमध्ये रिहॅबमध्ये असेल आणि तो क्रिकेट वेस्ट इंडिजचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. इस्रायल यांच्या देखरेखीखाली असेल. जानेवारी 2022 मध्ये आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या मालिकेपूर्वी त्याच्या दुखापतीची पुन्हा तपासणी केली जाईल.

कायरन पोलार्डने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्याने वेस्ट इंडिजकडे आता दोन कर्णधार असतील. टी-20 मध्ये निकोलस पूरन संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे तर वनडेमध्ये शाय होप संघाचे नेतृत्व करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 5 T20I सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने पराभूत केले तेव्हा पूरन हाच कर्णधार होता. शाय होप पहिल्यांदाच एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल, तर पूरन वनडे संघाचा उपकर्णधार असेल. टी-20 मालिकेत शाय होप संघाचा उपकर्णधार असेल.

13 डिसेंबरपासून वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा

वेस्ट इंडिज संघाला 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जायचे आहे. 13 डिसेंबरपासून हा दौरा सुरू होणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मालिकेतील सर्व सामने कराचीतील नॅशनल स्टेडियमवर होणार आहेत. एकदिवसीय मालिका ही आयसीसी पुरुष विश्वचषक पात्रता स्पर्धेतील वेस्ट इंडिजची चौथी मालिका असेल. अव्वल 7 संघांना 2023 मध्ये भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपोआप पात्रता मिळेल. 13 संघांमध्ये वेस्ट इंडिज सध्या 8व्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पाकिस्तानविरुद्धची मालिका जिंकून त्यांना स्पर्धेसाठी आपला दावा मजबूत करण्याची संधी असेल.

सामन्यांचं वेळापत्रक

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात आधी टी-20 मालिका खेळवली जाणार आहे, ज्याचे सामने 13, 14 आणि 16 डिसेंबर रोजी होणार आहेत. यानंतर 18, 20 आणि 22 डिसेंबर रोजी वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. हे सर्व सामने कराचीतील नॅशनल स्टेडियमवर होणार आहेत.

इतर बातम्या

Sara tendulkar : सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या स्पेशल डेटची सोशल मीडियावर चर्चा

IND vs NZ : अवघ्या 62 धावांत न्यूझीलंडचा खुर्दा, पाहुण्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Thane : विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम सज्ज, 5 सामने खेळवले जाणार


(Kieron Pollard not available for Pakistan tour amid injury)

Published On - 3:12 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI