मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला जात आहे. आज (5 डिसेंबर) या सामन्याचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवसातील पहिल्या सत्रात प्रेक्षकांना एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलने नेहमीप्रमाणे चांगली खेळी केली. दरम्यान, पहिल्या सत्राच्या अखेरीस शुभमनने टिम साऊथीला एक शानदार चौकार लगावला, तेव्हा चाहत्यांनी स्टेडियममध्ये ‘सचिन…सचिन…’ असा जयघोष सुरू केला. (IND vs NZ : Mumbai crowd chants ‘Sachin Sachin’ after Shubman Gill smashes four to Tim Southee)