AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA : न्यूझीलंड दक्षिण अफ्रिका सामन्यात या खेळाडूंची असेल चलती! पॉइंट्सचं गणित जुळवण्यास करतील मदत

World Cup 2023, NZ vs SA : न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभूत झालेल्या संघाला उपांत्य फेरीसाठी जोरदार लढत द्यावी लागेल. असं असताना पॉइंट्सच्या दृष्टीने काही खेळाडू महत्त्वाचे ठरतील, जाणून घेऊयात

NZ vs SA : न्यूझीलंड दक्षिण अफ्रिका सामन्यात या खेळाडूंची असेल चलती! पॉइंट्सचं गणित जुळवण्यास करतील मदत
NZ vs SA : न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेचे हे 11 खेळाडू करतील मालामाल! जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
| Updated on: Oct 31, 2023 | 3:40 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 32 वा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. या सामन्याकडे तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण दक्षिण अफ्रिका दुसऱ्या, तर न्यूझीलंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे जय पराजय गुणतालिकेवर बराच प्रभाव टाकून जाईल. दक्षिण अफ्रिकेने 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यात 10 गुण आणि +2.032 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ 8 गुण आणि +1.232 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यातील जय पराजय गुणतालिकेवर बराच प्रभाव टाकणार आहे. हे दोन्ही संघ 71 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात दक्षिण अफ्रिकेने 41, तर न्यूझीलंडने 25 सामन्यात विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हे संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यात न्यूझीलंडने 6, तर दक्षिण अफ्रिकेने 2 वेळा विजय मिळवला आहे.

पिच रिपोर्ट

पुण्याच्या एमसीए मैदानात दोन्ही संघ भिडणार आहेत. या मैदानातील खेळपट्टी काळ्या मातीची आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर चेंडूला बऱ्यापैकी उसळी मिळते. त्यामुळे प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मिळतो. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दोन सामने या मैदानावर खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यात धावांचा पाठलाग करणारा संघ सामना जिंकला आहे. भारताने बांगलादेशला 7 विकेट, तर अफगाणिस्तानने श्रीलंकेला 7 गडी राखून पराभूत केलं होतं. हवामानाच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता अजिबात नाही.

ड्रीम इलेव्हन 1

मार्को जॅनसेन (कर्णधार), एडन मार्कराम (उपकर्णधार), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, क्विंटन डी कॉक, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रेंट बोल्ट.

ड्रीम इलेव्हन 2

हेनरिक क्लासेन (कर्णधार), रचिन रवींद्र (उपकर्णधार), टॉम लॅथम, मार्को जॅन्सन, केन विल्यमसन, रॅसी व्हॅन डेर डुसेन, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम(कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

दक्षिण अफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा