AUS vs NZ : वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड एकमेकांना भिडणार, टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय

AUS vs NZ World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये आज न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज सामना होणार आहे. या सामन्यामध्ये कांगारूंनी विजय मिळवला तर ते सेमी फायनलमधील आपली जागा आणखी पक्की करतील.

AUS vs NZ : वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड एकमेकांना भिडणार, टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय
Harish Malusare | Updated on: Oct 28, 2023 | 11:14 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सामना सुरू आहे. भाराताकडून झालेला पराभव वगळता सर्व सामने न्यूझीलंड संघाने जिंकले आहेत. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची गाडी आता कुठे रूळावर आली आहे. आज धर्मशाला येथे दोन्ही संघ एकमेकांना भिडत असून न्यूझीलंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडला पराभूत करत कांगारू पॉईंट टेबलमध्ये सरशी साधण्याचा प्रयत्न करतील.

न्यूझीलंड संघान पाचमधील सलग चार सामने जिंकले होते. मात्र पाचव्या सामन्यात भारताने त्यांचा पराभव करत विजयरथ रोखला. भारत हा एकमेव संघ एकही सामना हरलेला नाही. न्यूझीलंडने आजच्या सामन्यात विजय मिळवला तर भारत, दक्षिण आफ्रिका यांच्या गुणांशी बरोबरी साधतील.

ऑस्ट्रेलिया संघ पहिले दोन्ही सामने हरला होता त्यानंतर त्यांनी सलग तीन सामने जिंकले. नेदरलँडविरूद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये झेप घेतली. आता कांगारूंचे सहा गुण असून आजच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांचेही 8 गुण होणार आहेत. सेमी फायनलचा  विचार केला तर तीन संघांचं गणित उघड होतं, ज्यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे तीन संघ जवळपास निश्चित मानले जात आहेत. आता जी काही चुरस आहे ती चौथ्या स्थानासाठी असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पॉईंट टेबलमध्ये एक नंबरचं स्थान घेतलं आहे. भारत आणि आफ्रिकेचे गुण समान आहेत. त्यामुळे आता सेमी फायनलसाठी आणखी मजा येणार असल्याचं दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (W), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

Follow Us