AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दार बदलले, चेहरे बदलले पण विचार नाही.. ठाकरे गटाकडून सणसणीत चपराक, मुंबईभर बॅनर्स लावत हल्लाबोल

शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनी पक्षाला पुन्हा फुटीचा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चेने राजकीय खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीही आज मुंबईत मेळावे आयोजित करत आहेत. उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांना काय सुनावतात याकडे लक्ष आहे, तर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत.

| Updated on: Jun 19, 2026 | 8:43 AM
Share
शिवसेना ठाकरे गटाचील 6 खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात पुन्हा फूट पडली असून मोठी खळबळ माजली आहे. ठाकरेंची साथ सोडून हे सहा खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा असून राजकीय भूकंपामुळे राज्य हादरलं आहे.  एकीकडे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असतानाच आज (19 जून) शिवेसेनेचा 60 वा, हिरक महोत्सवी वर्धापन दिन असून त्यानिमत्ताने ठाकरे गटाकडून षण्मुखानंद सभागृहात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी काय बोलतात, बंडखोर खासदारांना काय सुनावतात, याकडे सर्वांचे लक्षा लागले आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून  गोरगावच्या नेस्कोमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

1 / 6
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. ' गद्दार बदलले, चेहरे बदलले  पण विचार नाही' असे बॅनर अख्ख्या मुंबई शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले असून गद्दारांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

2 / 6
तसेच आणखीही काही बॅनर शिवसेनेतर्फे लावण्यात आले असून त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. जळलो, झुंजलो,उभे राहिलो... विश्वासघाताच्या राखेतून पुन्हा उभी राहण्याची जिद्द... हा इतिहास आहे शिवसेनेचा, 60 वर्ष अग्निपथावर.. असंही काही बॅनरवर लिहीण्यात आलंय.

3 / 6
दरम्यान  शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आज सभा आणि संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहे.  सहा खासदारांच्या शिंदे गटात सामील होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी यूबीटी आणि शिंदे गटाच्या  आज सभा आहेत .  त्यामुळे आज  मुंबई पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.  मुंबईतील प्रमुख ठिकाणी संघर्ष, निदर्शने आणि व्यत्यय टाळण्यासाठी पोलीस अधिकारी सज्ज झालेत.

4 / 6
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या  सभांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आज आपल्या संपूर्ण यंत्रणेला सतर्क राहण्यास सांगितलं आहे.  शहर पोलीस मुख्यालयाने सर्व उपआयुक्तांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.  गोरेगावमधील नेस्को (NESCO) येथे होणारी शिवसेनेची सभा विस्कळीत करण्याचा आणि निदर्शने करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.  याशिवाय, षण्मुखानंद हॉल येथे होणाऱ्या शिवसेनेच्या यूबीटी सभेत मोठ्या संख्येने पक्षाचे समर्थक उपस्थित राहू शकतात आणि शक्तीप्रदर्शन करण्याचे प्रयत्न होऊ शकतात.

5 / 6
शहरभर दोन्ही गटांच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका अपेक्षित आहे.  त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई पोलीस दलाला पूर्णपणे सज्ज राहण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांन मार्फत देण्यात आलेला आहे.  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापन मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे.  आजच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, आणि 6 खासदार खरंच मंचावर येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

6 / 6
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?