
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत न्यूझीलंडने इंग्लंडवर वरचष्मा गाजवला. तीन सामन्यांची वनडे मालिका न्यूझीलंडने 3-0 ने जिंकली. वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 222 धावा करू शकला. पण या विजयी धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगलाच घाम गाळावा लागला. न्यूझीलंडने 8 विकेट्स गमवून 45व्या षटकात विजय मिळवला. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा योग्य ठरला असंच म्हणावं लागेल. कारण इंग्लंडने आघाडीचे चार फलंदाज 31 धावांवरच गमवाले होते. तर 102 धावांवर 7 विकेट अशी स्थिती होती. जेमी ओवरटनच्या 68 धावांच्या खेळीमुळे 200 पार धावा झाल्या. तर ब्रायडन कार्सेने 36 धावा केल्या. न्यूझीलंडने 42 वर्षांनंतर वनडे सामन्यात इंग्लंडचा क्लीन स्वीप देण्याचा विक्रम रचला. यापूर्वी 1983 मध्ये न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला व्हाईट वॉश दिला होता.
न्यूझीलंडने विजयी धावांचा पाठलाग चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव अडखळला. न्यूझीलंडने 196 धावांवार 8 विकेट गमावल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 27 धावांची गरज असताना जॅक फाउलकेस आणि ब्लेयर टिकनर यांनी विजयी भागीदारी काली. जॅक फाउलकेसने 14, तर ब्लेयर टिकनरने 18 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात रचिन रविंद्रने 46, तर डेरिल मिचेलने 44 धावांची खेळी केली.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सांगितलं की, सर्वात आनंददायी गोष्ट आहे. म्हणजे, प्रत्येक पाठलाग करताना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या खेळाडू पुढे येत आहेत. पण मला वाटतं, तुम्हाला माहिती आहे, इंग्लंडला श्रेय. त्यांनी तिन्ही सामन्यांमध्ये कधीही सोपे केले नाही. आणि हो, तुम्हाला माहिती आहे, त्यांनी ते खूप कठीण केले, विशेषतः विकेटवर. त्यांच्यात अजूनही थोडीशी कमतरता होती. मला वाटतं, तुम्हाला माहिती आहे, तिन्ही सामन्यांमध्ये डॅरिल ज्या पद्धतीने मध्यभागावर नियंत्रण ठेवू शकला तो आमच्यासाठी उत्कृष्ट होता.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला की, ‘मला वाटले की क्रिकेटचा हा एक अद्भुत खेळ होता. आम्ही जवळजवळ त्या धावसंख्येचा बचाव केला होता. पण कदाचित पुरेसा नव्हता, तो खेळाडूंचा एक उत्तम प्रयत्न होता. फलंदाजीत आम्हीच चांगली सुरुवात करू शकलो नाही. ही एक गोष्ट आहे जी आम्ही बोललो आहोत. आम्हाला त्यांचा बचाव करण्यासाठी आणि गोलंदाजांना सामना जिंकण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी पुरेशी मोठी धावसंख्या मिळाली नाही.आम्ही परत जाऊ आणि या ट्रिपमधून आम्ही जे काही शिकलो आहोत ते घेऊ आणि भविष्यात चांगले होण्यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.’