NZ vs PNG: 4 ओव्हर 4 मेडन आणि 3 विकेट्स, Lockie Ferguson ची ऐतिहासिक कामगिरी

Lockie Ferguson 4 Maiden Overs: न्यूझीलंडचं आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. मात्र जाता जाता न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्यूसन याने इतिहास रचला आहे.

NZ vs PNG: 4 ओव्हर 4 मेडन आणि 3 विकेट्स, Lockie Ferguson ची ऐतिहासिक कामगिरी
Lockie Ferguson nz
| Updated on: Jun 17, 2024 | 11:48 PM

न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनिआ या दोन्ही संघांचं आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं आहे. दोन्ही संघ या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 39 व्या सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्याला पावसामुळे विलंबाने सुरुवात झाली. सामन्याचं आयोजन हे त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्यूसन याने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. लॉकीने असा रेकॉर्ड केलाय जो ब्रेक करणं जवळपास अशक्य आहे. लॉकीने आपल्या चारही चार ओव्हर्स मेडन टाकल्या.

टी 20 क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाला जास्तीत जास्त 4 ओव्हर टाकता येतात. लॉकीने या 4 ओव्हर्स मेडन टाकल्या अर्थात एकही धाव दिली नाही. लॉकीने 4 पैकी 3 विकेट मेडन टाकल्या, अर्थात त्या 3 ओव्हरमध्ये धाव दिल्या नाहीत. तर 1 ओव्हर फक्त मेडन टाकली. तसेच लॉकीने एकूण 3 विकेट्सही घेतल्या.

लॉकीने पीएनजीच्या डावातील चौथी, सहावी, बारावी आणि चौदावी ओव्हर टाकली. लॉकीने चौथ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर पीएनजी कॅप्टन असद वाला याला आऊट केलं. त्यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये त्याने एकही धाव दिली नाही. त्यानंतर 12 व्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली. तसेच 14 व्या ओव्हरमध्ये त्याने एका फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. लॉकीने आपल्या कोट्यातील चौथी आणि डावातील 14 व्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या, मात्र त्या बायच्या रुपात होत्या. बायच्या धावा गोलंदाजाच्या खात्यात जोडल्या जात नाहीत.

लॉकी फर्ग्यूसन दुसरा गोलंदाज

दरम्यान टी 20 वर्ल्ड कप इतिहासात गोलंदाजाने चारही ओव्हर्स मेडन टाकण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी कॅनडाचा कॅप्टन शाद बिन जफर याने 2021 साली पनामा विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 1 धाव न देता 2 विकेट्स घेतल्या होत्या.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: केन विल्यमसन (कॅप्टन), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

पापुआ न्यू गिनी प्लेइंग इलेव्हन: असद वाला (कॅप्टन), टोनी उरा, चार्ल्स अमिनी, सेसे बाऊ, हिरी हिरी, चाड सोपर, किपलिन डोरिगा (विकेटकीपर), नॉर्मन वानुआ, अले नाओ, काबुआ मोरिया आणि सेमो कामिया.