PM Kisan: शेतकऱ्यांना आता 6 हजार नाही, 12 हजारांची मदत? 22 वा हप्ता येण्यापूर्वी महत्त्वाची अपडेट
PM Kisan yojana 22nd installment update: पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता येण्यास अजून वाट पहावी लागेल. पण त्यापूर्वीच एक बातमी येऊन धडकली आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांच्या सन्माननिधीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता शेतकऱ्यांना वर्षाअखेर 6 हजार नाही तर 12 हजारांची मदत मिळण्याची शक्यता आहे.

PM Kisan yojana 22nd installment update: 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात DBT पद्धतीने थेट जमा करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये जवळपास 4.09 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. या रक्कमेत तीन हप्ते थेट बँक खात्यात जमा होतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. तर जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.
2024 मध्ये सन्माननिधी वाढवण्याची सूचना
डिसेंबर 2024 मध्ये संसद समितीने सूचना दिली होती की, पीएम किसान योजनेची वार्षिक रक्कम 6 हजार रुपयाऐंवजी आता ती 12 हजार रुपये करण्यात यावी. त्यामुळे आता नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार रुपये जमा होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. 22 वा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकरी कल्याण मंत्रालयाचा खुलासा
शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्य मंत्री रामनाथ ठाकूर यांनी यासंबंधी खुलासा केला आहे. हप्ता वाढवण्याची चर्चा सुरू असताना त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्यामते सरकारकडे ही रक्कम वाढवण्याविषयीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आता सध्याची 6,000 रुपयांची रक्कम कायम असेल. ती वाढवण्याचा सध्या कोणताही विचार नाही.
फार्मर आयडी ची त्रुटी दूर करा
फार्मर आयडीची अट या योजनेत नव्याने घालून देण्यात आली आहे. त्याविषयी सरकारने एक बाब स्पष्ट केली आहे. त्यानुसार, ज्या राज्यात फार्मर आयडीचे काम सुरू आहे. त्या राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे. सध्या एकूण 14 राज्यांमध्ये हे काम सुरू आहे. तर ज्या राज्यात फार्मर आयडीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. तिथल्या शेतकऱ्यांना सध्या या अटीतून सवलत देण्यात आली आहे.
आता 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा
सरकारने नुकताच 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे दोन हप्त्यातील अंतर पाहता पुढील हप्ता हा पुढील वर्षात जानेवारीच्या अखेरीस अथवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेत जमा होऊ शकतो. यासंबंधीची अपडेट पीएम किसान योजनेच्या साईटवर कळेल.
