
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही क्रिकेट संघ आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता द्विपक्षीय मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा रविवारी 15 मार्च रोजी होणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना झाला होता. न्यूझीलंडने त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं.त्यानंतर दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. अशात या मालिकेत कोणता संघ विजयी सलामी देण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघात होणारा पहिला सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल? हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना रविवारी 15 मार्च रोजी होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना बे ओव्हल, माउंट मौंगानुई इथे होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 11 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहायला मिळेल.
दरम्यान याच मैदानात रविवारी एकूण 2 सामने होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा दिवसातील दुसरा सामना असणार आहे. त्याआधी याच मैदानात वूमन्स न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेतील पहिली मॅच खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रविवारी 2 सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.