पीसीबीवर नामुष्की, शाहीन आफ्रिदीबाबत स्फोटक खुलासा

| Updated on: Sep 15, 2022 | 11:09 PM

शाहीन आफ्रिदीबाबत स्फोटक खुलासा समोर आल्यानं पीसीबीवर नामुष्की ओढावली आहे.

पीसीबीवर नामुष्की, शाहीन आफ्रिदीबाबत स्फोटक खुलासा
शाहीन आफ्रिदीबाबत स्फोटक खुलासा
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाची थेट नाचक्की झाल्याचं समोर आलंय. तेही खोट्या आरोपांमुळे. त्यामुळे सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चर्चेचा विषय ठरला आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून झालेल्या दारूण पराभवामुळे पाकिस्तानी संघ सर्वांच्या निशाण्यावर आहे. तर आता टी-20 (T-20) विश्वचषकासाठी संघ निवडीच्या मुद्द्यांमुळे पाकिस्तानी बोर्डाला टीकेला सामोरं जावं लागलंय. या सगळ्यामध्ये फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदीबाबत (Shaheen Afridi) एक असा खुलासा समोर आलाय की यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात पीसीबीविषयी चर्चा रंगली आहे. हे संपूर्ण काय  प्रकरण आहे. ते आधी समजून घ्या…

खर्च आणि आरोप

आपल्या क्रिकेट संघाची एवढी मोठी ओळख आणि संघाच्या जीवावर बेतलेल्या दुखापतींबाबतच्या हलगर्जीपणामुळे पीसीबीला आधीच सर्वांकडून टीकेला सामोरं जावं लागतंय. आता पाकिस्तानचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि शाहीन आफ्रिदीचा सासरा शाहिद आफ्रिदीनं लंडनमध्ये उपचार घेत असलेला शाहीन हा सर्व खर्च स्वतः उचलत असल्याचा स्फोटक खुलासा केला आहे. एका पाकिस्तानी वाहिनीशी बोलताना शाहिद असं म्हणालाय. त्यामुळे पीसीबीवर चांगलीच नामुष्की ओढावल आली.

हा व्हिडीओ पाहा

शाहिदचे आरोप

शाहिद आफ्रिदी म्हणाला की, मी शाहीनबद्दल बोललो तर त्याच्या जागी जो कोणी असेल. आता हा मुलगा (शाहीन) स्वतः इंग्लंडला गेला. इथून मी डॉक्टरांची व्यवस्था केली आणि तिथून तो डॉक्टरांशी बोलला. तो सर्व काही करत आहेत. पीसीबी यात काहीच करत नाही, असा आरोप शाहिदनं केलाय.

शाहीनविषयी हेही वाचा

  1. 22 वर्षीय शाहीन आफ्रिदी गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानी गोलंदाजीचा शिल्पकार म्हणून उदयास आलाय
  2. जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती
  3. त्यानंतर तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. त्याचवेळी शाहीनला तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्याऐवजी पीसीबीने नेदरलँड दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी आणि त्यानंतर आशिया कपसाठीही त्याची निवड केली.
  4. दरम्यान, तो तंदुरुस्त राहणार नसल्याचे लक्षात येताच आशिया चषकातून त्याचे नाव मागे घेण्यात आले. यानंतरही तो संघासह आशिया कपसाठी यूएईला गेला होता
  5. दुखापतीनंतर तब्बल दीड महिन्यानंतर शाहीन अखेर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचारासाठी लंडनला गेला.

अव्वल गोलंदाज

शाहीन शाह आफ्रिदीची गणना सध्या अव्वल गोलंदाजांमध्ये केली जाते. तो पाकिस्तानी गोलंदाजीचा कणा आहे. अशा परिस्थितीत त्याची टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघात निवड झाली आहे. याआधी आशिया चषकासाठीही तो पाकिस्तान संघाचा भाग होता. पण, जुलैमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तो या स्पर्धेत खेळू शकला नव्हता.