जुना चेंडू आणि बाउंड्री लाइनवर झेल..! क्रिकेटचे काही नियम या तारखेपासून बदलणार, जाणून घ्या सविस्तर

आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात अमुलाग्र बदल झाला आहे. आयसीसीने आता व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटच्या नियमात बदल करण्याच निश्चय केला आहे. यात वनडे क्रिकेटमध्ये जुन्या चेंडूच्या वापराबाबतचा नियमही आहे. काय आहेत हे नियम ते जाणून घेऊयात सविस्तर

जुना चेंडू आणि बाउंड्री लाइनवर झेल..! क्रिकेटचे काही नियम या तारखेपासून बदलणार, जाणून घ्या सविस्तर
भारतीय क्रिकेट संघ
Image Credit source: PTI
| Updated on: May 31, 2025 | 4:25 PM

क्रिकेट खेळात गेल्या काही वर्षात अमुलाग्र बदल झाले आहेत. यामुळे क्रिकेट पाहण्याचा रोमांच द्विगुणित झाला आहे. आयसीसीच्या नव्या नियमामुळे क्रिकेटमधील रोमांच वाढणार आहे. आयसीसीने नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमाची अंमलबजावणी जून 2025 पासून होणार आहे. व्हाइट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटमधील अनेक नियम बदलले जाणार आहेत. यामुळे फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना समान न्याय मिळणार आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, वनडेत जुना बॉल, कनकशन सब्स्टीट्यूट, डीआरएल आणि बाउंड्री लाईनवर घेतल्या जाणाऱ्या झेलच्या नियमात काही बदल केले जाणार आहेत. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांना समान संधी मिळेल असं सांगण्यात येत आहे.

वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजांना फायदा

क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांना समान न्याय मिळावा हा आयसीसीचा मुख्य उद्देश आहे. मर्यादीत षटकांच्या फॉर्मेटमध्ये फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्यामुळे गोलंदाजी करणं खूपच कठीण झालं आहे. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये दोन चेंडूचा नियम बदलण्याची योजना केली आहे. दोन्हीकडून नव्या चेंडूचा वापर केला जात होता. यामुळे गोलंदाजांना स्विंग आणि सीम मूव्हमेंटमध्ये उणीव भासत होती. पण जून 2025 पासून नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. वनडेत आता 34 षटकापर्यंत दोन चेंडूंचा वापर होईल. त्यानंतर 35 ते 50 षटकापर्यंत फक्त एकच चेंडू वापरला जाईल.

35व्या षटकापासून जुन्या चेंडू निवडण्याचा अधिकार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे असेल. वापरलेल्या दोन चेंडूपैकी एकाची निवड केली जाईल. दुसरीकडे, वनडे क्रिकेटमध्ये पाऊस किंवा इतर काही कारणास्तव 25 षटकांपेक्षा खेळ असेल तर दोन्ही डावात फक्त 1-1 चेंडूचा वापर होईल. वनडेमध्ये हा नियम 2 जुलैपासून श्रीलंका आणि बांग्लादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेपासून लागू होईल.

इतर नियमातही बदल होणार

कनकशन सब्स्टीट्यूट नियम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यामुळे आता सामना सुरु होण्यापूर्वी मॅच रेफरीला पाच कनकशन रिप्लेसमेंट खेळाडूंची नावं द्यावी लागतील. या पाच खेळाडूंमध्ये एक विकेटकीपर, एक फलंदाज, एक वेगवान गोलंदाज, एक फिरकीपटू आणि एक अष्टपैलू असेल. यासोबात बाउंड्रीवर झेल आणि डीआरएस प्रोटोकॉल नियमातही बदल होणार आहे. हे नियम लवकरच सर्व संघांना कळवले जाणार आहेत. कसोटी नव्या नियमाची अमलबजावणी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2025 पासून लागू होईल.