करायला गेला एक आणि झालं भलतच, इंडिया-पाकिस्तानच्या भांडणात इंग्लंडची वाट

| Updated on: Sep 27, 2022 | 10:21 PM

भारत पाकिस्तानच्या भांडणात इंग्लंड मध्यस्ती करायला गेला आणि काय झालं ते वाचाच....

करायला गेला एक आणि झालं भलतच, इंडिया-पाकिस्तानच्या भांडणात इंग्लंडची वाट
क्रिकेट आणि भारत-पाकिस्तान वाद
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन्ही देशातील वाद सर्वश्रूत आहे. याच वादात आता इंग्लंडनं (England) उडी घेतली आणि जगभराच्या नजरा त्याकडे लागल्या आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यामुळे दोन शेजारी देशांमधील द्विपक्षीय मालिकेचा दुष्काळ संपुष्टात येईल, अशी आशा होती. पण, झालं वेगळंच. भारतीय क्रिकेट बोर्डानं म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) हा प्रस्तान नाकारला.

बीसीसीआयची भूमिका काय?

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं की, ‘पहिली गोष्ट म्हणजे ईसीबीनं भारत-पाक मालिकेबाबत पीसीबीशी बोलले आहे. हे थोडं विचित्र आहे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेचा निर्णय बीसीसीआय नाही तर सरकार घेईल.’

टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार ईसीबीचे उपाध्यक्ष मार्टिन डार्लो यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली. हे संभाषण सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान दरम्यान खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेत झाले आहे.

भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्यांनी इंग्लंडमधील मैदानाचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.

ईसीबीला फायदा?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला की स्टेडियम खचाखच भरलेले असतात. संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप-2022 मध्ये हे दिसून आले.

इंग्लंडचा वेगळाच प्लॅन

प्रेक्षक आपल्या स्टेडियमवर येतील या दृष्टीने ECBनेही हा प्रस्ताव ठेवला आहे. इंग्लंडमध्ये भारत आणि पाकिस्तानात राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे, याकडेही बघितलं गेलं पाहिजे.

पाकिस्तानचा संघ 2013 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी त्यानं तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली यात भारताचा 1-2 असा पराभव झाला.

दोन टी-20 सामनंही खेळले गेले ज्यात एका सामन्यात भारतानं तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवला. इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली तेव्हा पाकिस्तानी खेळाडू या लीगमध्ये खेळत होते. पण, त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय लीगमध्ये खेळण्याची परवानगी नव्हती.