
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. बांगलादेशने तिसऱ्या दिवशी चिवट प्रतिकार केला आहे. पाकिस्तानने त्यांचा डाव हा दुसऱ्या दिवशी 448 धावावंर घोषित केला. बांगलादेशने प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसापर्यंत बिनबाद 27 धावा केल्या. तर बांगलादेशने तिसरा दिवस खेळून काढला. बांगलादेशने तिसऱ्या दिवसात एकूण 5 विकेट्स गमावून 289 धावा केल्या. अशाप्रकारे बांगलादेशने तिसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 92 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 316 धावा केल्या. त्यानंतरही बांगलादेश आता 132 धावांनी पिछाडीवर आहे.
बांगलादेशकडून शादमन इस्लाम, मुशफिकुर रहमान, लिटॉस दास आणि मोमिनूल हक या या चौघांनी सर्वाधिक धावा केल्या. शादमन इस्लाम याने 183 बॉलमध्ये 93 रन्स केल्या. मोमीनूल हक याने 50 धावांची खेळी केली. कॅप्टन नजमल हुसैन शांतो 16 धावा करुन माघारी परतला. शाकिब अल हसनने 15 धावांची भर घातली. तर झाकीर हसनने 12 धावा केल्या. तर मुशफिकुर आणि लिटॉन दास ही जोडी नाबाद परतली.
अनुभवी मुशफिकुरने 122 चेंडूत 55 धावांची खेळी केली. तर लिटॉनने 58 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने 2 विकेट्स मिळवल्या. तर नसीम शाग आणि मोहम्मद अली आणि सॅम अय्युब या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली.
दरम्यान आतापर्यंत बांगलादेशने ज्या प्रकारे बॅटिंग केलीय, ते पाहता पाकिस्तानला डाव घोषित करणं महागात पडणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. पाकिस्तानने सामन्यातील दुसऱ्या दिवशी 113 ओव्हरमध्ये 6 बाद 448 धावांवर डाव घोषित केला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान याने नाबाद 171 तर सऊद शकीलने 141 धावा केल्या. तर सॅम अय्युबने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर बांगलादेशसाठी शोरिफूल इस्लाम आणि हसन महमूद या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
बांगलादेशची तिसऱ्या दिवशी कडवी झुंज
Bangladesh 🆚 Pakistan | 1st Test | Day 03
Stumps| Bangladesh trail by 132 runs.
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/7KarwWOOm1— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 23, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.