
मुंबई: इंग्लंडची टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही टीम्समध्ये T20 सीरीज सुरु आहे. ही मालिका गोलंदाजांसाठी फारशी चांगली ठरलेली नाही. खासकरुन यजमान पाकिस्ताच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई झालीय. दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये इंग्लंडने 199 धावा फटकावल्या. त्यानंतर पुढच्याच दिवशी शुक्रवारी इंग्लंडने 221 धावा फटकावल्या. इंग्लंडचा 23 वर्षांचा फलंदाज हॅरी ब्रूकने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
कुठल्याही बॉलरला हॅरीने दयामाया दाखवली नाही. पण याच दरम्यान सुदैवाने तो एका मोठ्या दुर्घटनेतून बचावला. त्यानंतरही हॅरी थांबला नाही. त्याच हिम्मतीने त्याने फलंदाजी सुरु ठेवली.
ब्रूकने केली धुलाई
कराचीमध्ये काल इंग्लंड आणि पाकिस्तानच्या टीममध्ये तिसरा टी 20 सामना झाला. या मॅचमध्ये हॅरी ब्रूकने आक्रमक बॅटिंग केली. इंग्लंडसाठी टी 20 मध्ये डेब्यु करणाऱ्या या फलंदाजाने पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने फक्त 35 चेंडूत 81 धावा कुटल्या. ब्रूकने त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार लगावले. ब्रूकच इंग्लंडकडून खेळताना हे पहिलचं अर्धशतक होतं.
काही वेळासाठी सगळेच जण टेन्शनध्ये
त्याच्या या इनिंग दरम्यान एक क्षण असाही आला, जेव्हा सगळ्यांच्याच काळाजाचा ठोका चुकला. काही वेळासाठी सगळेच जण टेन्शनध्ये आले. पाकिस्तानचा हॅरिस रौफ 18 वी ओव्हर टाकत होता. हॅरीस रौफ सरासरी 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. आपल्या वेगवान चेंडूंनी तो फलंदाजांना हैराण करतो. ब्रूक सोबतही त्याने असंच केलंय
“Caught in the grille”
Brook gets a hug from Rauf after the sharp bouncer ?#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/UZRljMQt9C
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 23, 2022
नेमकं काय घडलं?
रौफने शॉर्ट पीच चेंडू टाकला. चेंडू प्रचंड वेगात होता. ब्रूकला या चेंडूने चकवलं. तो योग्य फटका खेळू शकला नाही. चेंडू हेल्मेटच्या ग्रिलला भेदून आतमध्ये घुसला. सुदैवाने तो चेहऱ्याला लागला नाही. अन्यथा मोठी दुखापत झाली असती.