IND vs PAK : पाकिस्तानच्या 8 विकेट्स तरीपण भारत विजयी कसा? जाणून घ्या!

Team India : भारत-पाक सामन्यामध्ये भारताने 228 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या सामन्यात पाकिस्तान संघ 128-8 असताना का आणि कशामुळे भारताला विजयी घोषित करण्यात आलं. जाणून घ्या.

IND vs PAK : पाकिस्तानच्या 8 विकेट्स तरीपण भारत विजयी कसा? जाणून घ्या!
| Updated on: Sep 12, 2023 | 8:01 AM

मुंबई : आशिया कप 2023मध्ये  भारत आणि पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताच्या शिलेदारांनी पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. किंग विराट कोहली, के. एल. राहुल यांची द्विशतकी भागीदारी आणि त्यानंतर कुलदीप यादवने घेतलेल्या पाच विकेट्सच्या जोरावर भारताने पाकिस्तानावर आतापर्यंतचा इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 356 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र पाकिस्तान संघाचा डाव 128 धावांवर आटोपला होता. मात्र अनेकजणांना प्रश्न पडला की पाकिस्तान संघाच्या 8 विकेट पडला असताना भारताचा विजय कसा झाला? जाणून घ्या.

म्हणून टीम इंडिया विजयी घोषित केलं!

भारताकडून कर्णधार रोहित शर्मा 76 आणी शुबमन गिल 58 यांच्या 121 धावांच्या भागीदारीने चांगली सुरूवात झाली होती. दोघेह बाद झाले आणि मैदानाता विराट कोहली आणि के. एल. राहुल उतरले. दोघांनाही अक्षरक्ष: कहर केला. वर्ल्ड बेस्ट बॉलिंग लाईन अप म्हटलं जाणाऱ्या पाकिस्तान संघाच्या तिन्ही मुख्य बॉलरचा घाम काढला.

विराट कोहलीने अवघ्या 94 चेंडूत 122 धावा केल्या यामध्ये त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. तर राहुलने 106 चेंडूत 111 धावा केल्या, यामध्ये त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले. दोघांनीही नाबाद राहत भारताला 350 धावांचा टप्पा पार करून दिला.

पाकिस्तानच्या 8 विकेट पडल्या असताना भारताला विजयी घोषित करण्यात आलं. 128 धावांवर असताना भारताने विजय साकारला खरा पण दोन विकेट्स न घेता भारत विजयी कसा? याचं कारण म्हणजे पाकिस्तानचे मुख्य बॉलर नसीम शाह आणि हॅरीस रॉफ यांना दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांनी सामन्यात बॉलिंगही केली होती. absent hurt म्हणून त्यांना जाहीर केलं आणि भारताला विजयी म्हणून घोषित करण्यात आलं.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रॉफ.