IND vs PAK : विराट, राहुल, कुलदीप यांना नाहीतर रोहितने भलत्यांनाच दिलं विजयाचं श्रेय, का आणि कशासाठी वाचा?
Rohit Sharma on ind vs pak : टीम इंडियाने पाकिस्तानवर 228 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यामध्ये विराट, राहुल यांनी शतके केलीत. त्यासोबतच कुलदीप यादवने पाच विकेट घेत पाकिस्तानचा अर्धा संघ माघारी पाठवला. मात्र रोहितने सामन्याचं विजयाचं भलत्यालाच दिलं आहे.

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील सामना अत्यंत चुरशीचा होईल असं वाटलं होतं. मात्र विराट कोहली आणि के. एल. राहुल यांची द्विशतकी भागीदारी आणि त्यानंतर कुलदीप यादवच्या पाच विकेट्सच्या जोरावर भारताने हा सामना 228 धावांनी जिंकला. भारताचा पाकिस्तानवर वन डे क्रिकेटमध्ये मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने आपली प्रतिक्रिया देताना पाहा कोणाचे आभार मानले आहेत.
काय म्हणाला रोहित शर्मा?
ग्राउंड्समनने घेतलेल्या मेहनतीमुळे हा सामना पूर्ण होऊ शकला. कारण मैदानावर कव्हर्स काढणं आणि टाकणं खूप अवघड काम आहे. त्यामुळे आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचे मनापासून आभार. आम्ही फलंदाजीला सुरूवात केली तेव्हा लक्षात आलेलं की विकेट फलंदाजीसाठी चांगलं आहे. फक्त पावसासोबतच्या वातावरणासोबत जुळवून घ्यायचं असल्याचं रोहितने सांगितलं.
राहुल आणि विराट यांनी खेळपट्टीवर जम बसवण्यासाठी काहीसा वेळ घेतला त्यानंतर त्यांनी सामना पूढे नेला. बुमराहने दोन्ही बाजूने चेंडू स्विंग केला. त्याने गेल्या 8 ते 10 महिन्यांमध्ये त्याने खूप मेहनत घेतली आहे. दुखापतीतून परतल्यानंतर राहुलला टॉसच्या 5 मिनिटं आधी सांगण्यात आलं की तो खेळणार आहे. त्याने जे प्रदर्शन केलं त्यावरून दिसून येतं की त्याची मानसिकता सकारात्मक आहे, असं रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रॉफ.
