AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : विराट कोहली याने पाकिस्तानच्या चिंधड्या उडवत ठोकलं दमदार शतक

विराट कोहलीसह के. एल. राहुल यानेही  शतक करत जोरदार कमबॅक केलं. दोघांनी नाबाद 233 धावांची भागीदारी करत पाकिस्तान संघाला विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं आहे. या शतकासह विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

IND vs PAK : विराट कोहली याने पाकिस्तानच्या चिंधड्या उडवत ठोकलं दमदार शतक
| Updated on: Sep 11, 2023 | 7:37 PM
Share

मुंबई : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये किंग विराट कोहली याने शतक ठोकलं आहे. कोहलीने अवघ्या 94 चेंडूंमध्ये 122 धावा केल्या, यामध्ये त्याने 3 षटकार आणि 9 चौकार मारत शतकाला गवसणा घातली. विराट कोहलीने या शतकासह 77 वं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. वनडेमध्ये कोहलीने 47 शतके केली असून तो वन डेमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत तो दुसरा नंबरवर आहे. विराट कोहलीसह के. एल. राहुल यानेही  शतक करत जोरदार कमबॅक केलं. दोघांनी नाबाद 233 धावांची भागीदारी करत पाकिस्तान संघाला विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं आहे.

विराटने रचलेले विक्रम-

या शतकासह विराट कोहलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराटने 13000 हजार धावांचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये पार केला आहे. अवघ्या 267 धावांमध्ये विराटने 13000 धावा पूर्ण केल्या आहेत. इतकंच नाहीतर चौथ्या विकेटसाठी राहुल आणि विराटने 233 धावांची विक्रमी भागीदारी केलीये.  इतकंच नाहीतर आशिया कपच्या इतिहासातीलसुद्धा ही विक्रमी भागादारी आहे. तर आशिया कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीमध्ये विराट आणि संगकारा चार शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर पहिल्या स्थानी शोएब मलिक आहे.

रविवारी आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आजच्या दिवसाला सुरूवात करताना दोघांनी सावध सुरूवात केली होती. मधल्या ओव्हरमध्ये राहुलने आक्रमण सुरू ठेवलं होतं. त्यानंतर दोघांनीही आक्रमक पवित्रा घेतला. खास करून विराटने शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये अक्षरक्ष: रडवलं, दोघांनीही शतके केलीत आणि भारताला 350 धावांचा टप्पा पार करून दिला.

भारत – रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (C), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, नसीम शाह.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.