Video : सराव सामन्यातही बाबर आझम फेल, अतिशहाणपणा नडला आणि मधला स्टंप उडला

पाकिस्तानात चॅम्पियन्स कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेपूर्वी बाबर आझम सराव सामन्यात खेळत होता. पण इथेही त्याच्या दांड्या गूल झाल्या. डावखुऱ्या फिरकीपटूसमोर त्याचं काही एक चाललं नाही. त्याला फक्त 20 धावाच करता आल्या.

Video : सराव सामन्यातही बाबर आझम फेल, अतिशहाणपणा नडला आणि मधला स्टंप उडला
| Updated on: Sep 10, 2024 | 8:17 PM

पाकिस्तानचा टी20 कर्णधार बाबर आझम सध्या वाईट काळातून जात आहे. कसोटी, वनडे असो की टी20 क्रिकेट त्याची बॅट काही चालत नाही. त्यामुळे त्याचे चाहतेही निराश झाले आहेत. त्याचा फॉर्म परत येईल याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र असं असताना त्याच्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. कारण बाबर आझम साध्या सराव सामन्यातही फेल ठरला आहे. बाबर आझम स्टॅलियंस संघात असून लायंसविरुद्ध सराव सामना पार पडला. बाबर आझम या सामन्यात फक्त 20 धावा करून तंबूत परतला. बाद पण काही साधा झाला नाही तर मधला दांडा घेऊन गेला. बाबर आझमने गोलंदाजाला स्वीप मारण्यासाठी तयार झाला आणि तिथेच फसला. बॉल पायांमधून असा घुसला की मधला स्टम्प घेऊन गेला. बाबर आझमला लायंसचा फिरकीपटू मोहम्मद असगरने बाद केलं.

25 वर्षीय डावखुरा फिरकीपटू मोहम्मद असगरने बाबर आझमची विकेट काढली. त्याचा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहता एकदम कसलेला गोलंदाज असल्याचं दिसून येतं. त्याने 49 फर्स्ट क्लास सामन्यात 177 विकेट घेतल्या आहेत. तर लिस्ट ए सामन्यातील 78 सामन्यात 116 विकेट घेतल्या आहेत. तर टी20 मध्ये 66 विकेट नावावर केल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 7.26 रन प्रती ओव्हर आहे. बाबर आझमने डिसेंबर 2022 मध्ये सर्वात मोठी खेळी केली होती. तिथपासून आतापर्यंत तो धावा करताना झुंजताना दिसला आहे. तेव्हापासून आतापर्यंत एकही अर्धशतक ठोकलेलं नाही. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तर त्याला आपलं खांतही खोलता आलं नव्हतं. या सराव सामन्यात पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदने चांगली फलंदाजी केली. त्याने 80 चेंडूत 90 धावा केल्या.

चॅम्पियन्स वनडे कप 204 स्पर्धा 12 सप्टेंबरपासून पाकिस्तानात होत आहे. या स्पर्धेत 5 संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत 29 वर्षीय बाबर आझम मोहम्मद हारिसच्या नेतृत्वात खेळणार आहे. या स्पर्धेनंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंडशी दोन हात करणार आहे. या मालिकेत तीन कसोटी सामना खेळणार आहे. पहिला सामना 7ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.