T20 WC: पाकिस्तान क्रिकेटची भयानक अवस्था, PCB च्या दोन अधिकाऱ्यात हेडक्वार्टरमध्ये मारामारी

T20 WC: पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये हे काय चाललय?

T20 WC: पाकिस्तान क्रिकेटची भयानक अवस्था, PCB च्या दोन अधिकाऱ्यात हेडक्वार्टरमध्ये मारामारी
pcb
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 04, 2022 | 4:05 PM

लाहोर: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची स्थिती खराब आहे. काल त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकला. सेमीफायनलमध्ये कसं पोहोचता येईल? याकडे त्यांच्या टीमच लक्ष लागलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सुद्धा आपल्या वेगवेगळ्या समस्यांमध्ये गुंतल आहे. आता पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.

पीसीबी हेडक्वार्टरमध्ये घडली घटना

अधिकाऱ्यांनी परस्परांवर हात उगारले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या डायरेक्टवर एका सहकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. आता हा विषय शिस्तपालन आयोगाकडे पोहोचला आहे. पाकिस्तान क्रिकेट डॉट कॉमनुसार, ही घटना पीसीबी हेडक्वार्टरमध्ये घडली. हाणामारीचा हा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

संबंध सुरुवातीपासून खराब होते

मीडिया आणि कम्युनिकेशन डायरेक्टर सामी अल हसन आणि कमर्शियल डायरेक्टर उस्मान वहीद यांचे संबंध सुरुवातीपासून खराब होते. मागच्या काही दिवसात दोघांमधील संबंध आणखी बिघडले. पाकिस्तान क्रिकेट डॉट कॉमने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.

सामीने उस्मानला ढकललं

सामीवर उस्मान ढकलून त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी वाद आणखी वाढणार नाही, याची काळजी घेतली.

सामी विरुद्ध लिखित तक्रार

उस्मानने यानंतर लिखित तक्रार नोंदवली आहे. मीडिया डायरेक्टरने माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आक्षेपार्ह शब्द वापरले, असं उस्मान यांनी लिखित तक्रारीत म्हटलय. हे प्रकरण शिस्तपालन आयोगाकडे सोपवण्यात आलय. या प्रकरणात एक बैठक सुद्धा झाली आहे.

तक्रार मागे घेण्यासाठी दबाव

दोघांच म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आणि पुरावे तपासल्यानंतर या प्रकरणात निर्णय दिला जाईल. पीसीबीच्या सीनियर अधिकाऱ्यांनी उस्मानवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला आहे. पण तो यासाठी तयार झाला नाही. बिनशर्त माफिची ऑफरही त्यांनी धुडकावली. उस्मानला या प्रकरणात सामी विरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल करायचा आहे.