
लाहोर: रिटायरमेंट नंतरही पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी नेहमी चर्चेत असतो. बऱ्याचदा गंभीर विषयावर भाष्य करणारा शाहिद आफ्रिदी फार कमी वेळा मजा,मस्करी करताना दिसतो. आफ्रिदी नेहमीच आपल्या फॅन्सबरोबर प्रेमाने, अदबीने वागताना दिसतो. सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.
यामध्ये आफ्रिदीच्या एका चाहत्याने त्याच्यासमोर टी-शर्ट काढलं. त्यानंतर लालाने त्याच्या पोटावर ऑटोग्राफ दिला. शाहिदने ऑटोग्राफ देण्याआधी या चाहत्याबरोबर चांगलाच हास्य-विनोद केला.
तो पीएसएलमध्ये खेळला
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच कर्णधारपद भूषवलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतरही तो पीएसएलमध्ये खेळला. शाहिद आफ्रिदीला पाच मुली आहेत. शाहिद लहान मुलांसोबत नेहमीच मजा, मस्करी करतानी दिसतो.
यात काय आहे मॅकडी की केएफसी?
टि्वटरवर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात शाहिद आफ्रिदी कुठल्यातरी रुममध्ये बसलेला दिसतो. एक लहान मुलगा पाकिस्तानची जर्सी घालून आला होता. तो मुलगा आफ्रिदीसमोर आपलं टी-शर्ट काढतो. शाहिद आफ्रिदीने त्या मुलाच्या पोटाकडे बघून प्रेमाने त्याला विचारतो. “यात काय आहे मॅकडी की केएफसी? हे कमी केलं पाहिजे. क्रिकेट खेळायच असेल, तर हे कमी केलं पाहिजे” असं आफ्रिदी त्या मुलाला म्हणाला.
.@SAfridiOfficial signs autograph on kid’s tummy?#ShahidAfridi #T20WorldCup #TrendingNow #trendingvideos pic.twitter.com/AKymdV86Hp
— muzamilasif (@muzamilasif4) November 2, 2022
आफ्रिदीने पोटावर दिली ऑटोग्राफ
मुलाने टी-शर्टवर आफ्रिदीची ऑटोग्राफ मागितली. त्यावर आफ्रिदीने सांगितलं की, मी तुझ्या पोटावर ऑटोग्राफ देणार. मार्करने त्याने मुलाच्या पोटावर स्वाक्षरी केली. यावेळी तिथे उपस्थित असलेले लोक हसत होते. ऑटोग्राफ मिळाल्यानंतर तो मुलगा आनंदी झाला.