
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याने बरीच चर्चा रंगली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्याची चर्चा सुरु झाली होती. आशिया कप स्पर्धा अशीच हायब्रीड मॉडेलवर खेळवली गेली होती. मात्र यावेळेस पीसीबी काहीही झालं तर स्पर्धा पाकिस्तानाच होईल असं सांगत आहे. मात्र या आडमुठ्या भूमिकेला धक्का बसणार आहे. कारण बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आयसीसीची सूत्र आता जय शाह यांच्या हाती गेली आहेत. त्यामुळे पाकिस्तानची मोठी अडचण झाली आहे. 1 डिसेंबर 2024 पासून जय शाह अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आयसीसी अध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागून असेल. जय शाह अध्यक्ष असल्याने पाकिस्तानची अडचण होणार हे निश्चित आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून एकूण 15 सामने होणार आहेत. 12 सामने साखळी फेरीचे होणार आहे. तर दोन सामने उपांत्य फेरीचे आणि एक सामना अंतिम फेरीचा असेल. भारत आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटात आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.
Preparations for the upcoming Champions tournament 🏏
Mentors of the Champions Cup sides had a meeting with PCB officials at the National Cricket Academy in Lahore today.#DiscoveringChampions pic.twitter.com/9lmpKtKt4C
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 27, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने आधीच 586 कोटी रुपये मंजूर केलं आहे. पण भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला तर 45 लाख डॉलर्स अतिरिक्त दिले आहेत. म्हणजेच 37.67 कोटी रुपयांचं अतिरिक्त बजेट ठेवलं आहे. त्यामुळे हायब्रीड मॉडेलची तयारी आधीपासूनच सुरु झाल्याचं दिसत आहे. हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा झाल्यास सामने दुबईत होईल, असं सांगण्यात येत आहे.