Abu Dhabi T10 League: पाकिस्तान-इंग्लंडच्या फलंदाजांची धुवाधार बॅटिंग, फक्त 19 चेंडूत लुटल्या 94 धावा

| Updated on: Nov 29, 2022 | 12:46 PM

Abu Dhabi T10 League: दोन्ही देशांच्या फलंदाजांनी मिळून आक्रमक बॅटिगं केल्यामुळे विशाल धावसंख्या उभी राहिली.

Abu Dhabi T10 League: पाकिस्तान-इंग्लंडच्या फलंदाजांची धुवाधार बॅटिंग,  फक्त 19 चेंडूत लुटल्या 94 धावा
Abu Dhabi T10 League
Image Credit source: AFP
Follow us on

दुबई: क्रिकेट बदलतय, तसं खेळण्याचा अंदाजही बदलतोय. क्रिकेटला जन्टलमन गेम म्हटलं जायचं. पण आता क्रिकेटच्या खेळात आक्रमकता आली आहे. क्रिकेटर्स बरोबर खेळण्यातही तीच आक्रमकता पहायला मिळते. सध्या अबू धाबी T10 लीग टुर्नामेंट सुरु आहे. या स्पर्धेत पाकिस्तान आणि इंग्लंडचे फलंदाज मिळून तुफानी खेळ दाखवत आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड दोन्ही देशांचे फलंदाज धावांचा पाऊस पाडतायत.

पाकिस्तान-इंग्लंडच्या फलंदाजांनी मिळून धुतलं

अबू धाबी T10 लीगमध्ये चेन्नई ब्रेव्स आणि नॉर्दर्न वॉरियर्समध्ये सामना होता. नॉर्दर्न वॉरियर्सने हा सामना 34 धावांनी जिंकला. नॉर्दर्न वॉरियर्सने पहिली फलंदाजी केली. त्यांच्या इनिंगची सुरुवात पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज उस्मान खान आणि इंग्लंडच्या एडम लीथने केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावा जोडल्याय उस्मान खानने 270.83 च्या स्ट्राइक रेटने 24 चेंडूत 65 धावा चोपल्या. यात 6 चौकार आणि 5 षटकार होते.

दोघांच्या बळावर विशाल धावसंख्या

एडम लीथने सुद्धा अशीच धुवाधार बॅटिंग केली. त्याने 216 च्या स्ट्राइक रेटने 25 चेंडूत 54 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 4 षटकार होते. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर नॉर्दर्न वॉरियर्सने 10 ओव्हर्समध्ये 141 धावांची विशाल धावसंख्या उभारली.

फक्त 19 चेंडूत 94 धावा

उस्मान आणि लीथने मिळून 19 चेंडूत 94 धावा कशा लुटल्या. ते शक्य झालं, बाऊंड्रीजमुळे. उस्मानने 6 चौकार आणि 5 षटकार मिळून 11 चेंडूत 54 धावा फटकावल्या. लीथने 8 चौकारांच्या बळावर 40 धावा वसूल केल्या. अशा प्रकारे दोघांनी 19 चेंडूत 94 धावा फटकावल्या. नॉर्दर्न वॉरियर्सने विजयासाठी 142 धावांच टार्गेट दिलं होतं. चेन्नई ब्रेव्सची टीम फक्त 107 धावा करु शकली. हा सामना त्यांनी 34 धावांनी गमावला.