16 व्या वर्षी पदार्पणातच 73 धावा ठोकल्या, मग दहशतवाद्यांनी थेट बंदूक चालवून बॅटिंग रोखली

| Updated on: Jun 10, 2021 | 12:53 PM

एखादा खेळाडू अर्धशतक बनवून खेळत असेल आणि अशावेळी दहशतवाद्यांमुळे त्याला फलंदाजी करणे थांबवावे लागले तर...वाचा कधी आणि कोणासोबत असं झालं होतं.

16 व्या वर्षी पदार्पणातच 73 धावा ठोकल्या, मग दहशतवाद्यांनी थेट बंदूक चालवून बॅटिंग रोखली
ind vs pak
Follow us on

लाहोर : अवघ्या 16 वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या सामन्यापासून संघासाठी महत्त्वाची खेळी करण्यास सुरुवात केली. एक सलामीवीर म्हणून संघासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. पण एका महत्त्वाच्या खेळीमध्ये दहशतवाद्यांनी व्यत्यय आणला. हे घडलंय पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) सलामीवीर खुर्रम मंजूर (Khurram Manzoor) याच्यासोबत. खुर्रमचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म 10 जून 1986 रोजी कराची येथे झाला आहे. तर नेमक कसं दहशतवाद्यांमुळे खुर्रमचा महत्त्वाचा सामना बिघडला ते जाणून घेऊया. (Pakistani Cricketer khurram Manzoor Birthday Today he Debuted in 16 year)

गोष्ट आहे 2009 ची जेव्हा श्रीलंकेचा क्रिकेट संघ पाकिस्‍तानच्या दौऱ्यावर होता. 1 मार्चपासून कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीला लाहोरमध्ये सुरुवात झाली होती. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत 606 धावांचा डोंगर उभा केला. थिलन समरवीराने (Thilan Samaraweera) 214, तिलकरत्‍ने दिलशानने (Tilakratne Dilshan) 145 रन आणि कुमार संगकाराच्या (Kumar Sangakkara) 104 धावांच्या
जोरावर ही मोठी धावसंख्या श्रीलंका संघाने बनवली. पाकिस्‍तानने आपली पाळी येताच सलमान बट (Salman butt) आणि खुर्रम मंजूरच्या मदतीने बचावात्मक सुरुवात केली.

दहशतवादी हल्ल्यामुळे सामना रद्द

श्रीलंकेच्या 606 धावांचा पाठलाग करताना पाकिस्‍तानची 1 बाद 110 अशी स्थिती होती. सलमान बट 74 चेंडूक 48 धावा करुन रनआऊट झाला. पण खुर्रम मात्र 59 धावांवर नाबाद होता. त्याने 71 चेंडूत 11 चौकार लगावले होते. पण अशाच स्थितीत दुसऱ्या दिवशी श्रीलंकन संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात श्रीलंकेचे काही खेळाडू गंभीर जखमी झाले. त्यामुळे तो उर्वरीत दौरा रद्द करुन श्रीलंकन संघ मायदेशी परतला. त्यामुळे खुर्रम 59 धावांवर नाबाद राहिला आणि एक महत्त्वाच्या खेळापासून दहशतवाद्यांमुळे मुकला.

ऑस्‍ट्रेलिया विरोधात सहा तास क्रिजवर

खुर्रमने 2009-10 च्या सुमारास ऑस्‍ट्रेलिया दौऱ्यावर होबार्ट कसोटीमध्ये सहा तास क्रिजवर राहून चिवट फलंदाजी केली होती. पाकिस्तान तो सामना पराभूत झाला असला तरी खुर्रमची चिवट झुंज मात्र वाखाणण्याजोगी होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात ऑक्टोबर 2013 मध्ये खुर्रमने अबु धाबीमध्ये 146 धावांची धडाकेबाज खेळी केली. पाकिस्‍तानने सामनाही सात विकेट्सने जिंकला. खुर्रमची ही सर्वोत्कृष्ठ खेळी होती. आपल्या कारकिर्दीत खुर्रमने पाकिस्‍तानसाठी 16 कसोटी सामन्यांत 28.17 च्या सरासरीने 817 रन्स केला आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.
तर 7 एकदिवसीय सामन्यांत 33.71 च्या सरासरीने 236 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा –

रोहित शर्माला घाबरला ‘हा’ पाकिस्‍तानी गोलंदाज, म्हणतो त्याच्यासारखे शॉट्स तोच खेळू शकतो

WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…

WTC Final पूर्वी टीम इंडियावर निर्बंध, साऊथहॅम्प्टनमध्ये खेळाडूंना एकमेकांना भेटण्यासही मज्जाव

(Pakistani Cricketer khurram Manzoor Birthday Today he Debuted in 16 year)