
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या निघृण हल्ल्यानंतर भारतात संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हल्ल्याच्या अनेक दिवसांनंतरही भारतात प्रत्येक ठिकाणी या घटनेचा निषेध केला जात आहे. तसेच जनभावना या तीव्र आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला भारताबाबत संतापजनक आणि चिड आणणारं वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिदी आफ्रिदी याला त्याच्याच माजी सहकाऱ्याने जागा दाखवून दिली आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू आणि हिंदू असलेल्या दानेश कनेरियाया याने आफ्रिदीची लायकीच काढली आहे. तसेच आफ्रिदीवर आरोप करत त्याच्यावर भारत सरकारने बंदीची कारवाई करावी, कनेरियाने अशी मागणी केली आहे.
शाहिद आफ्रिदीवर भारतात बंदी घालावी. तसेच आफ्रिदीचा कोणताही कार्यक्रम टीव्हीवर दाखवू नये, अशी मागणी कानेरियाने भारत सरकारकडे केली आहे. तसेच आफ्रिदी पाकिस्तानी सेनेकडून पैसे घेऊन भारताबाबत बरळतोय. तसेच तो लोकांची माथी भडकवतोय, असा आरोप कनेरियाने आफ्रिदीवर केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने विविध प्रकारे पाकिस्तानची कोंडी केली. त्यामुळे खवळलेला आफ्रिदी भारत भारतीय सेनेबाबत बरळला. भारत सरकार आपल्याच लोकांना मारतात आणि त्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवतात, असं संतापजनक वक्तव्य आफ्रिदीने केलं. त्यानंतर आता आफ्रिदी याच्या या वक्तव्यावरुन कनेरियाने त्याची कानउघडणी केली आहे.
आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी भारतीय सेनेला जबाबदार ठरवलं होतं. एका पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बोलताना आफ्रिदीने भारतीय सेनेचा बेकार असा संतापजनक उल्लेख केला. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी पाकिस्तानलाच जबाबदार ठरवलं जात असल्याचंही आफ्रिदीने म्हटलं होतं.
“भारतात फटाका फुटला तरीही त्याचा आरोप पाकिस्तानवर केला जातो. काश्मीरमध्ये 8 लाख भारतीय सैन्य आहे. त्यानंतरही जर तिथे हल्ला झाला, त्यावरुन हे स्पष्ट होतं की भारतीय सैन्य किती अकार्यक्षम आहे. भारतीय सैन्य कुणालाही सुरक्षा देऊ शकत नाही”, असं म्हणत आफ्रिदीने सैन्य दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान आपल्यावर आफ्रिदीकडून आपल्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र मी त्याचं ऐकलं नाही. त्यामुळे आफ्रिदी मला त्रास द्यायचा. आफ्रिदी माझ्यासोबत जेवणही करायचा नाही, जे मला फार अपमानकराक वाटायचं”, असा आरोपही कनेरियाने आफ्रिदीवर केला. “तसेच माझ्यात प्रतिभा असूनही मला पाकिस्तानमध्ये तो सन्मान मिळाला नाही”, अशी खंतही कनेरियाने बोलून दाखवली.