
सिडनी: T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी टीमचा संघर्ष सुरु आहे. पाकिस्तानसाठी सेमीफायनलचा मार्ग सोपा नाहीय. आधी भारत त्यानंतर झिम्बाब्वेकडून पाकिस्तानची टीम पराभूत झाली. त्यामुळे टीमवर चौफेर टीक सुरु आहे. T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी टीम जाहीर झाल्यापासून मायदेशात माजी क्रिकेटपटू सिलेक्शवर प्रश्न उपस्थित करतायत. आता टीमच प्रदर्शनही जेमतेम आहे. त्याचा दबाव टीम, खेळाडूंवर दिसून येतोय.
फखर जमांच्या जागी असीफ अलीची निवड
नेट्समध्ये एका पाकिस्तानी फलंदाजाची अस्वस्थतता दिसून आली. पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फखर जमां गुडघे दुखापत झालीय. त्याच्याजागी असीफ अलीची टीममध्ये निवड करण्यात आली. असीफ अली वर्ल्ड कपमध्ये अजून एकही सामना खेळलेला नाही.
चेंडू बॅटवर मिडल करता येत नव्हता
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचआधीचा पाकिस्तानी नेट्समधला एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात असीफ अलीचा संताप दिसून आला. असीफ अली नेट्समध्ये बॅटिंग प्रॅक्टिस करत होता. बॅटिंग करताना त्याला चेंडू बॅटवर मिडल करता येत नव्हता. नेट्समध्ये बॅटिंग करताना असीफ अलीचा संघर्ष सुरु होता.
Asif Ali throws away his bat in disgust while struggling in the nets pic.twitter.com/xPjFfkuMT9
— Ghumman (@emclub77) November 2, 2022
व्हिडिओ व्हायरल झालाय
बॅटिंग व्यवस्थित करता येत नाहीय, म्हणून असीफ अलीने संतापाच्याभरात बॅट फेकली. पण नंतर तीच बॅट उचलून त्याने पुन्हा फलंदाजीचा सराव सुरु केला. असीफ अलीचा बॅट फेकण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यातून पाकिस्तानी टीमवर असलेला दबाव दिसून येतो.