AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पलाशच्या चुलतीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे नव्या चर्चांना फोडणी, स्मृतीच्या लग्नाबाबत नेमकं काय घडतंय?

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न होणार आहे की नाही ही चर्चा आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक थेअरी मांडल्या जात आहेत. मात्र त्याबाबत अधिकृत असं काहीच नाही. असं असताना पलाशच्या चुलत भावाने पुन्हा एकदा व्हिडीओ पोस्ट करत चर्चांना फोडणी दिली आहे.

पलाशच्या चुलतीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे नव्या चर्चांना फोडणी, स्मृतीच्या लग्नाबाबत नेमकं काय घडतंय?
पलाशच्या चुलतीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे नव्या चर्चांना फोडणी, स्मृतीच्या लग्नाबाबत नेमकं काय घडतंय?Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 28, 2025 | 8:44 PM
Share

संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांचं लग्न जमल्यापासून ते थांबवण्यापर्यंत बरंच काही घडलं. भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर पलाशने स्मृती मंधानाच्या बोटात रिंग घालत लग्नाची मागणी केली. स्मृती मंधानाने त्याच्या या मागणीला होकार दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबात लगीनघाई सुरु झाली. दोन्ही कुटुंबाकडून 23 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. लग्नाचं ठिकाण, मंडप, वाजंत्री आणि सर्वकाही ठरवलं गेलं. नातेवाईकांना पत्रिकांचं वाटप झालं. सांगली या दोघांचं लग्न सोहळा पार पडणार म्हणून मीडियाही उपस्थित होता. लग्नापूर्वी संगीत, हळदी आणि क्रिकेटचा सामनाही रंगला. 23 तारीख उजाडली आणि लग्न मुहूर्तही जवळ आला. पण तेव्हाच स्मृतीच्या वडिलांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. पलाश मुच्छलने हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, असं त्याच्या आईने सांगितलं. त्यानंतर पलाशला अस्वस्थ वाटत असल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल केलं होतं. पण आता दोघांनाही डिस्चार्ज मिळाला आहे. आता पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे.

पलाशच्या चुलतीने इंस्टाग्राम खात्यावर हळदी आणि त्यानंतर झालेल्या कार्यक्रमांचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हळदीच्या व्हिडीओत पलाश नाचत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत स्मृती आणि पलाश क्रिकेटचा सामना खेळत आहेत. या दोन्ही व्हिडीओवर युजर्संनी कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. अनेकांनी पलाश आणि स्मृतीच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले आहे. एका युजर्सने लिहिले की, दोघेही लग्न बंधनात अडकणार ना? तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, स्मृती आणि पलाशला नेमकं काय झालं त्यावर स्पष्ट बोलायला सांगा. पलाशच्या चुलत भावाने पुन्हा एकदा व्हिडीओ पोस्ट केल्याने लग्नाची तारीख लवकरच काढली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Neeti Tak (@pahini21)

View this post on Instagram

A post shared by Neeti Tak (@pahini21)

स्मृती मंधानाचे वडील आणि प्रियकर पलाश मुच्छल या दोघांना डिस्चार्ज मिळाला आहे. पण दोन्ही कुटुंबियांकडून या लग्नाबाबत अधिकृत असं काही सांगण्यात आलेलं नाही. असं असताना पलाशच्या आईचं वक्तव्य मात्र व्हायरल होत आहे. ‘स्मृती आणि पलाश दोघेही तणावात आहेत. पलाशने त्याच्या वधूसोबत घरी येण्याचे स्वप्न पाहिले होते. मी खास स्वागताची तयारी केली होती. सर्व काही ठीक होईल. लग्न लवकरच होईल.’, असं अमिता मुच्छल यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी