‘आम्ही एका महान खेळाडूला गमावून बसलो’, मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक

| Updated on: Jun 19, 2021 | 6:45 AM

मिल्खासिंगजी यांच्या आयुष्याच्या प्रवासामधून बरेच अॅथलीट्स धडे घेतील, शिकतील... त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि जगभरातील अनेक चाहत्यांविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो, असं ट्विट मोदींनी केलं आहे. (Pm narendra modi tweet on Death Of milkha Singh)

आम्ही एका महान खेळाडूला गमावून बसलो, मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक
नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग (Milkha Singh Passed away) यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 20 मे 2021 रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खासिंग यांनी शुक्रवारी रात्री (18 जून) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मिल्खा सिंह यांच्या निधनाने आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो आहे. ज्यांनी देशाच्या कल्पनेवर कब्जा केला होता. करोडो भारतीयांच्या हृदयात ज्यांनी हक्काचं स्थान मिळवलं होतं. ते मिल्खा सिंग आपल्यात राहिले नाहीत, त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. (Pm narendra modi tweet on Death Of Milkha Singh)

काही दिवसांपूर्वी मी मिल्खासिंगजी यांच्याशी चर्चा केली. हे आमचे शेवटचे संभाषण होईल असं मला वाटलं नव्हते. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासामधून बरेच अॅथलीट्स धडे घेतील, शिकतील… त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि जगभरातील अनेक चाहत्यांविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो, असं ट्विट मोदींनी केलं आहे.

गुरुवारी कोरोना निगेटिव्ह

मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 मे रोजी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मिल्खा सिंग यांच्या शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना पीजीआयएमआर नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

पत्नीचा पाच दिवसांअगोदर मृत्यू

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर यांचा 5 दिवसांपूर्वीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पत्नीच्या जाण्यानंतर मिल्खा सिंग यांनी देखील आपली इनिंग संपवली. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यामुळे सिंग दाम्पत्याच्या एकापाठोपाठ एक मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

(Pm narendra modi tweet on Death Of milkha Singh)

हे ही वाचा :

Milkha Singh: ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन, कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी

Milkha Singh | पत्नीच्या मृत्यूनंतर 5 दिवसातच अखेरचा श्वास, पहिली भेट आणि मिल्खा सिंह यांची प्रेम कहाणी