Milkha Singh | पत्नीच्या मृत्यूनंतर 5 दिवसातच अखेरचा श्वास, पहिली भेट आणि मिल्खा सिंह यांची प्रेम कहाणी

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचा शुक्रवारी (18 जून) कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यांना 24 मे 2021 रोजी कोरोना उपचारासाठी मोहालीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Milkha Singh | पत्नीच्या मृत्यूनंतर 5 दिवसातच अखेरचा श्वास, पहिली भेट आणि मिल्खा सिंह यांची प्रेम कहाणी
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 1:47 AM

नवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचा शुक्रवारी (18 जून) कोरोनामुळे मृत्यू झालाय. विशेष म्हणजे मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला कौर यांचा 5 दिवसांपूर्वीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे मिल्खा सिंग यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. मिल्खा सिंग यांच्या कुटुंबीयांनी दोघांच्याही एकापाठोपाठ मृत्यूबद्दल बोलताना त्यांच्यातील प्रेमपूर्ण संबंधांच्याही आठवणींना उजाळा दिलाय (Know about love story of legendary Sprinter Milkha Singh and his wife).

मिल्खा सिंग यांच्या कुटुंबाने सांगितलं, “मिल्खा सिंग यांचा 18 जून 2021 रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी मृत्यू झाल्याचं सांगताना आम्हाला अतीव दुःख होत आहे. त्यांनी कोरोनाला कडवी झुंज दिली. निर्मलाजी यांच्या मृत्यूनंतर मिल्खाजींचा अवघ्या 5 दिवसांनी मृत्यू होणं हे त्या दोघांमधील खरं प्रेम दर्शवतं.”

काय आहे मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची प्रेम कहाणी?

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर खेळाच्या मैदानावरच झाली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्टी सुरु झाली. विशेष म्हणजे याआधी मिल्खा सिंग यांचे अनेक मुलींसोबतच्या प्रेमाच्या चर्चाही गाजल्या होत्या. मिल्खा सिंग यांचं नाव एक किंवा दोन नव्हे तर चांगल्या तीन मुलींसोबत जोडलं केलं आणि त्यांच्या प्रेमाचे किस्सेही चर्चिले गेले होते. मात्र, यापैकी कुणाशीही त्यांचं लग्न झालं नाही. कारण अॅथलेटिक्सच्या राजाचं मैदानावर हॉलीबॉलच्या राणीवर प्रेम जडलं.

पहिल्याच भेटीत मिल्खा सिंग यांचं मन जिंकलं

मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजरेला नजर 1955 रोजी कोलंबोला झाली होती. तेथे एका उद्योगपतीने भारतीय खेळाडूंसाठी डिनर आयोजित केला होता तेथेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले. तेव्हा त्यांनी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिल्याचाही किस्सा सांगितलाय.

पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघे पुन्हा भेटले. मात्र, त्यांच्या प्रेमाच्या गाडीने 1960 मध्ये वेग पकडला. तेव्हा दोघांची भेट दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनले होते. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत केलं.

लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरच्यांचा विरोध आणि थेट मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

मिल्खा सिंग यांचं नाव मोठं झालेलं असलं तरी निर्मला कौर या हिंदू आणि मिल्खा सिंग शिख असल्यानं निर्मला कौर यांच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा आला. यावेळी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.

मिल्खा सिंग यांना 24 मे 2021 रोजी कोरोना उपचारासाठी मोहालीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती जास्त खराब असल्यानं ते आयसीयूमध्ये उपचार घेत होते. 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना 19 मे रोजी कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. सुरुवातीला त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवली नव्हती. त्यामुळे त्यांना चंदीगडमधील आपल्या घरी गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं

Know about love story of legendary Sprinter Milkha Singh and his wife

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.