दुलिप ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉची शानदार खेळी, अजिंक्य रहाणे शांत

दुलिफ ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वी शॉनं शानदार खेळी केली आहे. तर अजिंक्य रहाणेला मात्र अजिंक्य राहता आलं नाही.

दुलिप ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉची शानदार खेळी, अजिंक्य रहाणे शांत
दुलिप ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉची शानदार खेळीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 7:02 PM

मुंबई : युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या दुलीप करंडक स्पर्धेत (Duleep Trophy) पश्चिम विभागाकडून खेळत आहे. टीम इंडियातून बाहेर पडणारा पृथ्वी शॉ सध्या चांगलाच  उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून सतत धावा निघत आहेत. हा संघ कोईम्बतूर येथील एसएनआर कॉलेज क्रिकेट मैदानावर सेंट्रल झोनविरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्यात शॉने आपली बॅट दाखवत शानदार शतक झळकावलंय. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा शुक्रवारचा खेळ संपेपर्यंत पश्चिम विभागाच्या संघानं शॉच्या शतकाच्या जोरावर तीन गडी गमावून 130 धावा केल्या आहेत. तर अजिंक्य रहाणे (Ajinkya rahane) मात्र यावेळी शांत दिसून आलं. त्यानं फक्त 12 धावा केल्या.

चांगली सुरुवात नाही

पश्चिम विभागाची सुरुवात चांगली झाली नाही. 14 च्या एकूण धावसंख्येवर त्यानं यशस्वी जैस्वालची विकेट गमावली. तो तीन धावा करून बाद झाला. पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणंही या डावात केवळ 12 धावा करून बाद झाला. राहुल त्रिपाठी तीन चेंडू न खेळताच बाद झाला. दरम्यान, एका टोकाकडून सातत्यानं विकेट पडत असताना शॉ आपल्या बॅटनं सतत धावा करत संघाला रोखून धरत होता. याआधी त्यानं पहिल्या डावातही अर्धशतक झळकावत 60 धावा केल्या होत्या. याआधी शॉनं उत्तर विभागाविरुद्धही शतक झळकावलं होतं. त्या सामन्यात त्यानं 113 धावांची इनिंग खेळली होती.

तीन षटकार मारले

एकूण 130 धावांपैकी 104 धावा एकट्या शॉच्या होत्या. वृत्त लिहेपर्यंत तो नाबाद होता. शॉनं आतापर्यंत 96 चेंडूंचा सामना केला असून 11 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. त्याच्यासोबत अरमान जाफर सात धावांवर नाबाद आहे.

सेंट्रल झोन

शॉ आणि राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पश्चिम विभागाच्या संघानं पहिल्या डावात 257 धावा केल्या होत्या. मात्र, मध्य विभागाच्या अर्धशतकांचाही त्यांना सामना करता आला नाही . हा संघ पहिल्या डावात 128 धावांत आटोपला. मध्य विभागाकडून कर्णधार कर्ण शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 34 धावांची खेळी खेळली. पश्चिम विभागाकडून जयदेव उनाडकटने तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय तनुष कोटियननेही तीन यश मिळवले होते. सीटी गाझा आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.